NAAC Sakal
एज्युकेशन जॉब्स

महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करण्याच्या सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या.

सम्राट कदम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या.

पुणे - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालय स्तरावर मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा धारण करण्यासाठी दर पाच वर्षांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेच्या (नॅक) तीने मूल्यांकन करून घेण्यात येते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही महाविद्यालयांना यासंबंधीचा अहवाल विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता व सिद्धताकक्षाकडे तसेच शासनाकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे. एनईपी २०२०च्या अनुषंगाने महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रम, बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्या आधारित अभ्यासक्रम, परिक्षा मूल्यमापन, अध्ययन अध्यापन आणि स्वायतत्ता आदी विषयांच्या बाबतीत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून महाविद्यालयांचे हे मूल्यांकन होणार आहे. पुढील सहा महिन्यात हे मुल्याकंनानुसार अपेक्षीत दर्जा प्राप्त करून घेणे महाविद्यालयांना बंधनकारक आहे.

काय असते नॅक?

शैक्षणिक संस्थेचा ‘दर्जा’ आणि ‘गुणवत्ता’ ओळखण्यासाठी मूल्यांकन महत्त्वाचे मानले जाते. हे मूल्यांकन कोणत्याही शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठ प्रमाणन एजन्सीद्वारे निश्चित केलेल्या गुणवत्तेची पातळी ठरवते. संस्थेची शैक्षणिक कामगिरी, अभ्यासक्रमाची निवड आणि अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा आणि मूल्यमापन, विद्यार्थ्यांचे निकाल, संशोधन कार्य आणि विद्याशाखा सदस्यांचे प्रकाशन, मूलभूत सुविधा आणि संसाधनांची स्थिती, संस्था, प्रशासन, आर्थिक स्थिती आणि विद्यार्थी सेवा इत्यादीची नोंद घेतली जाते.

नॅकची उद्दीष्ट्ये -

- शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन आणि दर्जा निश्चित करणे

- अध्यापन शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे

- स्वयंमूल्यमापणावर आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे

शासनाने प्राध्यापकांची रिक्त पदे भरली आणि आर्थिक बाजूवर महाविद्यालयांना बळ पुरविले तर निश्चितच नॅक मूल्यांकनाला त्याचा फायदा होईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर प्राचार्यांपासून ते सेवकांपर्यंत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिशानिर्देशन वजा सूचना परिपत्रके आल्यास महाविद्यालये मुल्यांकनात भरीव कामगिरी करतील.

- डॉ. एन. एस. उमराणी, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय (माजी प्र-कुलगुरू, एसपीपीयू)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT