Job  sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Tips : फ्रेशर आहात अन् मुलाखतीला जाताय? मग या अतिशय उपयुक्त टिप्स नक्की वाचा

नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी 'या' टिप्स वाढवतील तुमचा आत्मविश्वास

Aishwarya Musale

चांगली नोकरी मिळणे खूप अवघड आहे. बर्‍याचदा अनुभवी लोकांसाठीही त्यांच्या आवडीच्या नोकरीसाठी मुलाखती क्रॅक करणे इतके सोपे नसते. अशा परिस्थितीत इंटरव्ह्यूअर प्रभावित करून फ्रेशर म्हणून नोकरी मिळवणे ही लढाई जिंकण्यापेक्षा नक्कीच कमी नाही.

असे अनेकदा घडते की फ्रेशर्स अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अप्लाय करतात, परंतु ते मुलाखतींमध्ये मागे राहतात आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकत नाहीत.

कदाचित हे तुमच्यासोबतही अनेकदा घडत असेल. अशा परिस्थितीत तुम्ही खूप निराश आहात. पण जर तुम्ही काही छोट्या टिप्सचा अवलंब केला तर तुमच्यासाठी इंटरव्ह्यू क्रॅक करणे आणि फ्रेशर होऊनही नोकरी मिळवणे खूप सोपे होईल. तर आज आम्ही तुम्हाला या टिप्सबद्दल सांगत आहोत-

प्रेझेंटेबल दिसणे

जर तुम्हाला मुलाखतीत चांगली छाप पाडायची असेल, तर तुम्ही प्रेझेंटेबल दिसणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी कॉल आल्यावर ड्रेस कोडनुसार कपडे खरेदी करा. कंपनीची पॉलिसी लक्षात घेऊन तुम्ही कपडे निवडू शकता.

तुमच्या कपड्यांना व्यवस्थित इस्त्री करण्यासोबतच तुम्ही तुमचे शूज पॉलिशही केले पाहिजेत. तुमची मुलाखत ऑनलाइनअसली तरीही, ड्रेस कोडनुसार कपडे घालायला विसरू नका.

कंपनीबद्दल रिसर्च करा

बर्‍याचदा फ्रेशर मुलाखतीत अयशस्वी होतो कारण जेव्हा इंटरव्ह्यूअर त्याला कंपनीबद्दल काही प्रश्न विचारतो तेव्हा त्याला त्याबद्दल माहिती नसते. म्हणून, जर तुम्हाला कोणत्याही कंपनीकडून मुलाखतीचा कॉल आला असेल, तर प्रथम कंपनीबद्दल रिसर्च करा.

कंपनीचे उत्पादन किंवा सेवेव्यतिरिक्त, त्यांचे सध्याचे क्लायंट, ग्रोथ रिकॉर्ड आणि त्यांची उद्दिष्टे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

देहबोलीचीही काळजी घ्या

मुलाखतीदरम्यान तुमची देहबोलीही खूप महत्त्वाची असते. मुलाखतीदरम्यान तुम्ही कसे बसता आणि बोलता याचा तुमच्या समोरच्या व्यक्तीवर खोलवर परिणाम होतो. तुमची देहबोली तुमचा आत्मविश्वास दर्शवते. त्यामुळे तुमची नोकरी मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढते. तसेच बसताना जास्त वाकू नका. बोलत असताना चेहऱ्यावर हलके हसू तुम्हाला अधिक आत्मविश्वास देते.

डॉक्यूमेंटचे एक्सट्रा सेट

जेव्हा तुम्ही मुलाखतीला जात असाल तेव्हा तुमच्या सर्व महत्त्वाच्या डॉक्यूमेंटचे 2 किंवा 3 एक्सट्रा सेट ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलाखतीदरम्यान, HR तुम्हाला तुमच्या बायोडाटा ची हार्ड कॉपी मागू शकेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे एक्सट्रा सेट असेल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT