NEET-UG Row Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET-UG Row : ‘नीट’ ची सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी करा; कपिल सिब्बल

राज्यसभेचे खासदार असलेले सिब्बल यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

सकाळ वृत्तसेवा

NEET-UG Row: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील कथित अनियमततेची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी माजी मनुष्यबळविकास मंत्री कपिल सिब्बल यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केली. भविष्यात ही परीक्षा कशी घ्यायला हवी, यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांशी सविस्तर चर्चा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राज्यसभेचे खासदार असलेले सिब्बल यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की कोणत्याही परीक्षेतील चाचणी घेणारी यंत्रणा भ्रष्ट असेल तर पंतप्रधानांनी गप्प बसणे खरोखरच योग्य नाही. सर्वच पक्षांनी संसदेच्या आगामी अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे मांडायला हवा. असेही ते म्हणाले.

‘‘नीट परीक्षा घेणारी सध्याची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) खरोखरच गोंधळलेली असून या संस्थेतील भ्रष्टाचार प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणला आहे. कुणाला तरी डॉक्टर होण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.

गुजरातेतील अशा घटनांनी मला अस्वस्थ केले असून ही राष्ट्रीय चिंतेची बाब आहे. यातील गंभीर प्रश्नांची एनटीएने उत्तरे द्यायला हवीत. मात्र, याहून आश्चर्याची व निराशाजनक बाब म्हणजे सध्याच्या सरकारच्या काळात असे काही घडले की अंधभक्त ‘युपीए’ ला दोष देण्यास सुरुवात करतात. हे सर्वांत दुर्दैवी आहे ’’, असेही सिब्बल यावेळी म्हणाले.

घटनाक्रम उलगडला

कपिल सिब्बल म्हणाले, की भारतीय वैद्यकीय परिषदेने (एमसीआय) संचालक मंडळामार्फत २०१० मध्ये ‘नीट’ नियमन विधेयक सादर केले होते. ही परिषद शिक्षण मंत्रालयाच्या नव्हे तर आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित होती.

त्यामुळे, मनुष्यबळ विकास मंत्री या नात्याने माझा याच्याशी काहीही संबंध नव्हता. ‘नीट’ सारखी परीक्षा घेण्याची एमसीआयकडे वैधानिक क्षमता नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने नीट नियमन विधेयक २०१३ मध्ये रद्द केले.

त्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली. ‘नीट’ विधेयक रद्द करण्याबाबतचा आदेश मागे घेतल्याचे याचिकेत म्हटले होते. भाजपने ४ ऑगस्ट २०१६ रोजी कलम १०ड सादर करून भारतीय वैद्यकीय परिषद कायद्यात सुधारणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT