Admissions sakal
एज्युकेशन जॉब्स

व्यावसायिक अभ्यासक्रमातील नियमबाह्य प्रवेश होणार अमान्य

राज्यात सीईटी सेल अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

मीनाक्षी गुरव -GMinakshi_Sakal

राज्यात सीईटी सेल अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता याद्या जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील नामांकित खासगी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील जागा भरण्यास सुरवात केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींची तंत्रशिक्षण संचालनालयाने गांभीर्याने दखल घेतली असून नियमबाह्य प्रवेश अमान्य केले जातील असा इशाराही संचालनालयाने दिला आहे.

राज्यात सीईटी सेल अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण विभागातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्णवेळ व्यावसायिक पदवी पूर्व तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशांचे विनियमन) नियम २०१७ च्या पोट नियम १३ आणि सुधारित नियमांमध्ये दिल्यानुसार संस्थास्तरीय कोट्यातील जागा, अल्पसंख्याक कोट्यातील जागा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश विनाअनुदानित संस्थेतील संचालक किंवा प्राचार्य यांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी संपन्न झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या रिक्त जागा आणि संस्थास्तरावरील जागांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून संस्थेने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा स्पष्ट सूचना सीईटी सेलमार्फत देण्यात आल्या आहेत.

मात्र, तरीही  सीईटी सेलमार्फत गुणवत्ता याद्या जाहीर करण्यापूर्वीच नामांकित खासगी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाने आक्रमक पवित्रा घेत नियमबाह्य प्रवेश मान्य केले जाणार नसल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट करत कडक पावले उचलली आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नियमबाह्य प्रवेश देऊन शैक्षणिक भ्रष्टाचार केला जात असल्याचा उल्लेखही तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रकात केला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील असलेल्या काही संस्था नियमांचे उल्लंघन करून प्रवेश प्रक्रिया राबवीत असल्याचे दिसून येत आहे. प्रवेशाबाबत सक्षम प्राधिकारी हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आहेत. प्रवेशासंदर्भात त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करता नियमबाह्य पद्धतीने केलेल्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात येणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी,’ असा इशारा राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT