ISRO Recruitment 2023  esakal
एज्युकेशन जॉब्स

ISRO Recruitment 2023 : १२ वी पास उमेदवारांना इस्त्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

ISRO Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. इस्त्रोमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तरूणाईची धडपड सुरू असते. मात्र, आता तुमची धडपड थांबणार आहे. कारण, इस्त्रोमध्ये नुकत्याच टेक्निशिअन B पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त 'न्यूज१८ हिंदीने' दिले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही ३१ डिसेंबर २०२३ असणार आहे. त्यामुळे, या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांनी ३१ डिसेंबरच्या पूर्वी इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटवर isro.gov.in जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा

इस्त्रोच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ५४ पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे. त्यासोबतच, उमेदवाराकडे ITI चे सर्टिफिकेट असणे देखील महत्वाचे आहे.

निवड कशी होणार?

इस्त्रोच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर, कौशल्य चाचणीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क असणार ?

इस्त्रोतील या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रूपये द्यावे लागणार आहे. त्यानंतर, अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना ५०० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT