

NTA new appointment
ESakal
नीट पेपरफुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय चाचणी संस्थे (NTA) मधील महत्त्वाच्या प्रशासकीय नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) दोन सहसचिव आणि दोन सहसंचालकांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. अनुजा बापट आणि रुचिता विज यांची सहसचिव म्हणून तर आकाश जैन आणि आदित्य राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.