KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

Kolkata Knight Riders beat Gujarat Titans: ईडन गार्डन्सवरील १००व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिला. शुभमन गिल आणि जॉस बटलरची शतकी भागीदारी व्यर्थ ठरली.
KKR vs GT  | IPL 2026

KKR vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2025, KKR vs GT Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सला २९ धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला.

कोलकातासाठी हा विजय आणखी खास ठरला, कारण ईडन गार्डन्सवरील हा त्यांचा १०० वा सामना होता. गुजरातसाठी शुभमन गिल - जॉस बटलरने (Shubman Gill - Jos Buttler) शतकी भागीदारी केली, पण त्यांना संघाला विजयापर्यंत पोहचवता आले नाही.

या सामन्यात कोलकाताने २४८ धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला २० षटकात ४ बाद २१८ धावाच करता आल्या. कोलकाताचा हा १२ सामन्यांतील ५ विजय आहे. तसेच गुजरातचा मात्र १३ सामन्यांतील ५ वा पराभव होता. गुजरातने या सामन्यापूर्वी गेल्या ५ सामन्यांत सलग विजय मिळवले होते. पण अखेर त्यांचा हा विजयरथ कोलकाताने रोखला.

KKR vs GT  | IPL 2026
१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com