Income Tax Department esakal
एज्युकेशन जॉब्स

आयकर विभागात सरकारी नोकरीची संधी; 'या' जागांसाठी होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

आयकर विभागात सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

IT Recruitment 2022 : आयकर विभागात (Income Tax Department) सरकारी नोकरी (Government Jobs) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभाग, भारत सरकारनं प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पश्चिम बंगाल (West Bengal) आणि सिक्कीमच्या कार्यालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. विभागानं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, कर निरीक्षक, कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या (MTS) 24 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्जही मागविण्यात आले आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीनं 18 एप्रिल 2022 पर्यंत आपला अर्ज सबमिट करू शकतात.

भरतीसाठी पात्रता

आयकर विभागानं जारी केलेल्या भरती (IT Recruitment 2022) जाहिरातीनुसार, प्राप्तिकर निरीक्षक पदासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच उमेदवाराचं वय 18 ते 30 वर्षे असावं. कर सहाय्यक पदांसाठीच्या उमेदवारांकडं ग्रॅज्युएशन पदवी, तसेच 8000 KDPH वेगानं डेटा एंट्री करण्यास सक्षम असावं (वय 18 ते 27 वर्षे). मल्टी टास्किंग स्टाफसाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा कौन्सिलमधून दहावी उत्तीर्ण केलेली असावी (वय 18 ते 25 वर्षे).

निवड प्रक्रिया

जाहिरातीनुसार, सर्व पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना संबंधित चाचणीसाठी बोलावलं जाईल. तसेच कर सहाय्यक पदासाठी उमेदवारांना डेटा एंट्री कौशल्य चाचणी देखील द्यावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT