ITBP Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

ITBP मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी सरकारी नोकरी

सकाळ डिजिटल टीम

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सनं स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर पदांसाठी थेट भरतीची अधिसूचना जारी केलीय.

ITBP Recruitment 2021 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सनं (Indo Tibetan Border Police Force) स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर पदांसाठी थेट भरतीची अधिसूचना जारी केलीय. दरम्यान, ITBP मध्ये नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकतात. ITBP भरतीचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाइटवर itbpolice.nic.in प्रसिद्ध करण्यात आलेय.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBPF) 15 आणि 16 नोव्हेंबर 2021 रोजी स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी मुलाखत घेईल. या मुलाखती ग्रेटर नोएडा, चंदीगड आणि डेहराडून येथे विविध ठिकाणी होणार आहेत. स्थळ आणि अहवालाच्या वेळेचे तपशील अधिसूचनेत तपासले जाऊ शकतात.

कोण अर्ज करू शकतो?

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 च्या अनुसूचीनुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रताही हवीय. तसेच पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांसाठी दीड वर्ष, पदव्युत्तर पदवी किंवा पदविका प्राप्त केल्यानंतर संबंधित विशेष क्षेत्रातील पदविकाधारकांसाठी अडीच वर्षे असणार आहे.

वयोमर्यादा : ITBP भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांची वयोमर्यादा 70 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

ITBP निवड प्रक्रिया : या निवड प्रक्रियेत मुलाखत आणि वैद्यकीय चाचणीचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंडळाकडून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

वेतनमान : वैद्यकीय विशेषज्ञ अधिकारी या पदावर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना 85000 रुपये पगार देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT