JEE ADVANCE 
एज्युकेशन जॉब्स

देशभरात जेईई ॲडव्हान्स्डची 3 ऑक्‍टोबरला होणार परीक्षा

अरूण मलाणी

जेईई मेन्‍सच्‍या कामगिरीच्‍या आधारे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता ठरविली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी ११ ते १६ सप्‍टेंबरदरम्‍यान नोंदणीची मुदत उपलब्‍ध असेल. ३ ऑक्‍टोबरला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

नाशिक: इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. चौथ्या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षेला सुरवात झाली आहे. जेईई मेन्‍सच्‍या कामगिरीच्‍या आधारे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता ठरविली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी ११ ते १६ सप्‍टेंबरदरम्‍यान नोंदणीची मुदत उपलब्‍ध असेल. ३ ऑक्‍टोबरला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा चार सत्रांत जेईई मेन्‍स परीक्षा घेण्यात आली. मात्र, एप्रिल व मेमधील नियोजित परीक्षा कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झाल्‍या होत्‍या. त्यातच जुलैअखेर तिसऱ्या सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा झाली होती, तर चौथ्या व अंतिम सत्रातील जेईई मेन्‍स परीक्षा गेल्‍या गुरुवार (ता. २६) पासून सुरू झाली आहे. आता मंगळवारी (ता. ३१) तसेच १ व २ सप्‍टेंबरला दोन सत्रांत विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या चार सत्रांपैकी सर्वाधिक पर्सेंटाईलच्‍या आधारे विद्यार्थ्यांची जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता निश्‍चित होणार आहे.

या वर्षी आयआयटी, खरगपूर यांच्‍यातर्फे जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचे संयोजन केले जात आहे. आयोजन संस्‍थेने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्‍यानुसार पात्र विद्यार्थ्यांना ११ ते १६ सप्‍टेंबरदरम्‍यान ऑनलाइन नोंदणी करता येईल, तर ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठी १७ सप्‍टेंबरची मुदत असेल. ३ ऑक्‍टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजित असून, ऑक्‍टोबरच्‍या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागा वितरणाच्या प्रक्रियेला सुरवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT