JEE MAIN Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षा सेशन 1 चा निकाल जाहीर; 'असा' पाहा निकाल

या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक गुण मिळवले आहेत त्यांना सेशन-2 साठी पात्र ठरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षे 2022 सेशन 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी ७५ टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. यापरीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. (JEE Main 2022 Session 1 result has been declared)

या परीक्षेत ज्या उमेदवारांनी अपेक्षित गुण मिळवले आहेत ते आता पुढील सेशन २ साठी पात्र ठरले आहेत. यानंतर सेशन २ ची परीक्षा झाल्यानंतर एनटीएकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अंतिम कट ऑफ जाहीर केली जाईल.

'या' वेबसाईट्सवर जेईईचा निकाल पाहता येईल

jeemain.nta.nic.in

ntaresults.ac.in

nta.ac.in

Direct Link - JEE Main Result 2022

जेईई मुख्य सेशन १ निकाल कसा चेक कराल?

जेईईच्या jeemain.nta.nic.in या मुख्य वेबसाईटवर जा नंतर JEE Main 2022 Session 1 Result या लिंकवर क्लीक करा. यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुमचा निकाल पाहा आणि तो डाऊनलोड करा. यानंतर निकालाच्या प्रतीची प्रिंट काढून जवळ ठेवा.

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ कधी होणार?

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ एनटीएकडून घेण्यात येणार असून ती २१, २२, २३, २४, २५, २६,२७ ,२८ ,२९ आणि ३० जुलै २०२२ दरम्यान पार पडणार आहे. सेशन २ ची परीक्षा पार पडल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक (AIR) आणि कट ऑफ जाहीर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT