sakal vidya
sakal vidya sakal
एज्युकेशन जॉब्स

JEE NEET Exam : ‘जेईई’, ‘नीट’बाबत रविवारी मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करियरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन होणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

पुणे - तुम्ही नववी, दहावी आणि अकरावीची परीक्षा दिली आहे, पुढे काय करायचे?, करियरच्या संधी काय आहेत? उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे? जेईई आणि नीट परीक्षा कशी द्यायची? या बाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या रविवारी (ता. ३०) मिळणार आहेत. त्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे.

‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करियरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन होणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेश अर्थात ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. आपल्या सर्व परीक्षा संपल्या आहेत. बारावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे? इंजिनिअरिंग करायचे की मेडिकलला जायचे, याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका असतील, प्रश्न असतील. त्यांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि पेस आयआयटी अँड मेडिकल (प्रोफेशनल ॲकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन) यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष करून ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेशासंदर्भात मार्गदर्शनावर भर असेल.

सेमिनारविषयी....

  • काय - जेईई आणि नीट परीक्षेबरोबरच करिअर निवडीसंदर्भात मार्गदर्शन

  • कधी - रविवारी (ता. ३० एप्रिल

  • केव्हा - सकाळी १० वाजता

  • कुठे - गणेश कला क्रीडा केंद्र, स्वारगेट

  • प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजीनगरमध्ये तणाव! ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; जोरदार घोषणाबाजी

Dark Circle Remedy: प्रियांका चोप्राची आई मधु चोप्राने दिलेल्या टिप्सने दूर होतील डोळ्याखालील काळे डाग

PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: CM शिंदे श्रीरंग बारणेंच्या प्रचारात सहभागी; आज प्रचाराचा शेवटचा दिवस

Uddhav Thackeray : मोदींना महाराष्ट्र दिल्ली पाहू देणार नाही! ; उद्धव ठाकरे यांचा घणाघात,आता वानप्रस्थाश्रमात जा

SCROLL FOR NEXT