Job Opportunities for Voice Artist for Films TV Serials Animations Cartoon Films Advertisements Documentaries aurangabad  sakal
एज्युकेशन जॉब्स

Job Opportunities : आवाजाच्या दुनियेत तरुणाईचा बोलबाला

चित्रपट, टीव्ही िसरियल्स, अॅनिमेशन, कार्टून फिल्म, जाहिराती, माहितीपटासाठी व्हाईस आर्टिस्टला संधी

- शेखलाल शेख

औरंगाबाद : व्हीडीओ तयार करताना व्हॉईस ओव्हर महत्वाचा असतो. तुमच्या व्हीडीओचा कंटेंट कितीही चांगला असली तरी सुद्धा तुमच्या व्हिडीओत व्हाईस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजाचा दर्जा कमी असेल तर व्हीडीओला लाईक, व्ह्युज कमी मिळण्याची शक्यता असता असते. व्यवसाय किंवा ब्रँडला प्रमोट करण्यासाठी चांगल्या माहितीसोबत चांगला आवाज देणारा कलाकार असणे असणे गरजेचे आहे.

त्यामुळे सोशल मिडीयातील व्हीडीओ, वाढत्या ऑनलाईन मार्केटींगमधील आवाजाच्या जादुई दुनियेत वॉईस ओव्हर आर्टिस्ट, व्हॉईस अक्टर्स आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून तरुणांना रोजगार मिळविण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. वॉईस एक्टिंगच्या अगदी नव्या संधींपैकी एक म्हणजे ऑडियो बुक्ससाठी आवाज देणे तसेच ई लर्निंग.

भाषेवर प्रभुत्व हवेच

व्हाईस ओव्हर क्षेत्राविषयी एक मोठा गैसमज पाहायला मिळतो तो म्हणजे या क्षेत्रा येण्यासाठी भारदस्त आवाज हवा मात्र असे काही नाही. तुम्ही ज्या भाषेत व्हाईस ओव्हर करताय किंवा करणार आहात त्या भाषेवर तुमचे प्रभुत्व हवे. तुमचे बोलणे स्पष्ट असले पाहिजे. प्रत्येक शब्द नीट उच्चारता आला पाहिजे. ऐकणाऱ्या खिळवून ठेवता येईल असे तुमचे बोलणे असायला हवे.

व्हाईस ओव्हरचं शिक्षण कोणीही घेऊ शकतं. त्याला वयाची, शिक्षणाची कुठलीच अट नाही. आवाज कसा लावावा, तो केंव्हा, कसा बदलावा, आपल्या आवाजाद्वारे, श्रोत्यांना कसं खिळवून ठेवता येतं, या गोष्टींबद्दल तुम्हाला कुतूहल असेल, तुम्ही स्वत:च्या आवाजावर नव-नवीन प्रयोग करण्यास उत्सुक असाल, आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला अर्थार्जन करायचं असेल, तर तुम्ही एक वॉईस आर्टिस्ट बनू शकता.

घरबसल्या होऊ शकता व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट

सिनेमे, टीव्ही सीरीयल्स, कार्टून फिल्म, जाहिराती अशा अनेक क्षेत्रांत व्हाईस आर्टिस्ट लागतात. अगदी प्रचार, घोषणा, यांमध्ये आपल्याला ऐकू येणारे आवाजही वॉईस ओव्हर आर्टिस्ट्सचाच असतो. तुम्ही फोन केल्यावर कित्येक वेळा रेकॉर्ड केलेला आवाज येतो तो सुद्धा व्हाईस ओव्हर आर्टीचाच असतो. त्यामुळे तरुणांना यामध्ये नोकरीची, रोजगार मिळविण्याची संधी आहे. अनेक कंपन्या आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणारे लोक, पूर्णवेळ किंवा अर्धवेळ तत्वावर नोकऱ्या देतात. तसेच फ्रीलांसर म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी आहे. तुमच्याकडे स्टुडियो असेल किंवा तुमच्याकडे, रेकॉर्डिंगसाठी लागणारी पुरेशी साधन-सामग्री असेल तर घरबसल्या सेवा देऊ शकता.

विविध क्षेत्रात गरज

ऍनिमेशन, कार्टून आणि रेडीओ, टीव्ही जाहिराती, विविध व्यवसाय-उद्योग, शिक्षण क्षेत्रात रेकोर्डिंग्स करून घेण्यासाठी वॉईस ओव्हर आर्टिस्ट ची गरज असते. इंटरनेटवरील जाहिराती तसंच पोडकास्ट्समध्ये चांगल्या आवाजांची गरज असते.टीव्ही आणि रेडियो वरच्या जाहिरातींमध्ये वॉईस आर्टिस्टला रोजगाराच्या संधी आहे. कार्टून प्रमाणे व्हिडिओ गेम्स मधील पात्रांना आवाज देणे, वॉईसमेल आणि टेलीफोन रेकोर्डिंगमधेही मागणी आहे. नॅशनल जिओग्रोफीवर मालिकामधला विविध भाषेंमधील आवाज असो, व्हिडीओ माहिती पट, डाक्युमेंटरी अशा विविध क्षेत्रात तरुणांना संधी आहे.

व्हाईस ओव्हर शिकण्यासाठी तुम्ही सुरवातीला इंटरनेटचा आधार घेऊ शकता. इंटरनेटवर व्हाईस ओव्हरसंबंधी अनेक व्हीडीओ आहेत. ज्यातून तुम्ही अगदी मोफत शिकू शकता. तसेच कोर्स करुन किंवा एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊ शकता. स्वतःचा रेकॉर्डींग स्टुडीओ सुरु करुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ शकता.

-निखिल नवगिरे, व्हाईस ओव्हर आर्टीस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT