NHPC
NHPC Sakal
एज्युकेशन जॉब्स

NHPC मध्ये ट्रेनी ऑफिसर्स अन्‌ इंजिनिअर्स पदांच्या नोकऱ्या!

सकाळ वृत्तसेवा

हायड्रोइलेक्‍ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

देशातील मिनी रत्न कंपनी NHPC म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्‍ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (National Hydroelectric Power Corporation - NHPC) ने प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (Trainee Officer) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एनएचपीसीमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता भरती (Recruitment) अंतर्गत सिव्हिल (Civil), मेकॅनिकल (Mechanical), इलेक्‍ट्रिकल (Electrical) ट्रेडमध्ये भरती होईल. तर प्रशिक्षणार्थी अधिकारी अंतर्गत वित्त आणि कंपनी सचिवांची भरती केली जाईल. प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता यांच्या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार 17 जानेवारीपर्यंत NHPC च्या nhpcindia.co.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. (Jobs for Trainee Officers and Trainee Engineers in NHPC)

NHPC च्या सूचनेनुसार, प्रशिक्षणार्थी अभियंता भरतीसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांच्याकडे GATE 2021 स्कोअरसह GATE नोंदणी क्रमांक असेल. तर प्रशिक्षणार्थी अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे वैध CA / CMA स्कोअर आणि त्याचे वैध प्रमाणपत्र, CS सदस्यत्व प्रमाणपत्रासह CS स्कोअर असावे.

रिक्त जागांचा तपशील

  • प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य) - 29

  • प्रशिक्षणार्थी अभियंता (यांत्रिक) - 20

  • प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्‍ट्रिकल) - 4

  • प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) - 12

  • प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) - 2

इतका असेल पगार

  • 50000-3 टक्के - 1,60,000 (IDA)

वयोमर्यादा

  • प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी भरतीसाठी जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

आवश्‍यक शैक्षणिक पात्रता

  • प्रशिक्षणार्थी अभियंता : उमेदवार अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवीधर असणे आवश्‍यक आहे. याशिवाय बीएस्सी इंजिनिअरिंग केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवाराला बॅचलर पदवीमध्ये किमान 60 टक्के गुण असावेत. तसेच GATE परीक्षेचे गुणही असावेत.

  • प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) : चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया / ICWA किंवा CMA कडून CA.

  • प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) : भारतातील कंपनी सचिवांकडून कंपनी सचिव परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच त्याचे सदस्य असणे आवश्‍यक आहे.

अर्ज फी

  • सामान्य, EWS आणि OBC नॉनक्रीमीलेयर : रु. 295

  • SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक : अर्ज विनामूल्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: कार्यक्रमावरून घरी परतत असताना भीषण अपघात; पोलीस कॉन्स्टेबलसह ८ जणांचा जागीच मृत्यू, १ जखमी

South Africa : टी-20 वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिका संघ पेटला वादात! फक्त एकच कृष्णवर्णीय खेळाडूला संधी, बोर्डावर होतेय टीका

Poha Appe Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवा चविष्ट पोहे अप्पे, एकदम सोपी आहे रेसिपी

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : "पुण्यातील बेकायदा होर्डिग्ज 7 दिवसांच्या आत हटवा" महापालिका आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT