Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

सन २०२५-२६ पर्यंत 'या' क्षेत्रात असतील १ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी

टीमलीज डिजिटलने याविषयी अहवाल दिला आहे

सकाळ डिजिटल टीम

आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत १ कोटींपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. इंजिनिअरिंग, दूरसंचार आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात या नोकऱ्या वाढणार आहेत. एका अहवालाद्वारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंग विभाग टीमलीज डिजिटलने याविषयी अहवाल दिला आहे. अहवालात म्हटले आहे की पुनरुज्जीवन, तंत्रज्ञान आणि डिजिटलच्या वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील.

प्रोफेशनल्स एक्सपर्ट्सी वाढेल मागणी - अहवालानुसार एकूण रोजगार संधींपैकी १७ टक्के अत्यंत कुशल आणि विशेष तज्ञ कर्मचारी किंवा व्यावसायिक कर्मचारी उपलब्ध असतील. 'प्रोफेशनल जॉब्स - ट्रेंड्स इन डिजिटल एम्प्लॉयमेंट-रिपोर्ट' या अहवालात अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील 750 हून अधिक नियोक्ते/अधिकारी यांचे मत घेतले आहे.

Jobs

इंजिनियरिंग, टेलिकॉम आणि आरोग्य सेक्टर ४.० बदलाच्या दिशेने - टीमलिज डिजिटलचे पमुख सुनील सी म्हणाले की, अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्य सेवा ४.० बदलाच्या मार्गावर आहे. केंद्रीय औद्योगिक नियंत्रण असलेल्या प्रणालीपासून या सेवा स्मार्ट उत्पादने आणि प्रक्रियांकडे वळत आहेत. आज ते त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. सुनील यांच्या मते, उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना (PLI) आणि थेट विदेशी गुंतवणूकीमुळे(FDI) ही मागणी खूप वेगाने वाढते आहे. त्यामुळे या तीन क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी २५ ते २७ टक्क्यांनी वाढतील. प्रोफेशनल एक्सपर्ट्सची सध्याची मागणी ४५,६५,००० इतकी आहे. ती २०२६ पर्यंत सुमारे ९०,००,००० पर्यंत वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT