Indian Army  
एज्युकेशन जॉब्स

Indian Army : भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी; महिलाही करु शकतात अर्ज

यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत.

भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याने NCC स्पेशल एंट्री स्कीम 53 कोर्स अंतर्गत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊ शकतात. यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

भारतीय लष्कराने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, NCC विशेष प्रवेश योजनेचे ऑनलाइन अर्ज १७ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाले आहेत. पात्र उमेदवार १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली आवश्यक माहिती काळजीपूर्वक वाचा.

  • या भरतीसाठी केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा किमान ५०% गुणांसह समकक्ष असणे आवश्यक आहे.

  • अंतिम वर्षात शिकणाऱ्यांनाही अर्ज करण्याची परवानगी आहे. अशा विद्यार्थ्यांनी तीन किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन किंवा तीन वर्षांत किमान 50% गुण मिळवले असावते.

  • उमेदवाराची वयोमर्यादा 19 ते 25 वर्षे दरम्यान असावी.

किती आहेत जागा?

  • पुरुषांसाठी ५० जागा

  • स्त्रियांसाठी ५ जागा

  • एकूण जागा - ५५

निवड प्रक्रिया

पात्र अर्जदारांची निवड दोन टप्प्यांच्या आधारे केली जाणार आहे. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात पात्र होतील तेच दुसऱ्या निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत. उमेदवारांना एस.एस.बी मुलाखतीची तारीख वेळ आणि केंद्राच्या अधिकृत ईमेलद्वारे कळवली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 LIVE Update : ईव्हीएम गोंधळावर रोहित पवारांचा सवाल; निवडणूक आयोगाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

Iran Airspace Closure : इराणचे हवाई क्षेत्र बंद, अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता; एअर इंडिया, इंडिगोने जारी केली अडव्हायझरी

Pune Municipal Voting : मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना! पुण्यात मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, मतदार चक्रावले!

Pune Municipal Election : मदतीला धावून येणाऱ्यांना मत; पुण्यात स्थायिक झालेल्या परराज्यातील नागरिकांची भावना

Pimpri Accident : दुचाकीवरील दोन बहिणी भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी; आई-वडिलांनी गमावला आधार

SCROLL FOR NEXT