admissions process esakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट-२०२३

भारतातील व्यवस्थापन क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित अशी प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट CAT परीक्षा ही परीक्षा पदव्युत्तर एमबीए प्रवेशाकरिता घेतली जाते.

सकाळ वृत्तसेवा

- के. रवींद्र

भारतातील व्यवस्थापन क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठित अशी प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट CAT परीक्षा ही परीक्षा पदव्युत्तर एमबीए प्रवेशाकरिता घेतली जाते. देशातील एकूण २० ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) आहेत.

वेळापत्रक

  • १३ सप्टेंबर २०२३ - नोंदणी सायंकाळी ५ वाजेपर्यंत

  • २५ ऑक्टोबर २०२३ - प्रवेशपत्र डाऊनलोड सायंकाळी ५ वाजता सुरू

  • २६ नोव्हेंबर २०२३ - परीक्षा दिनांक

पात्रता निकष

CAT परीक्षेत बसण्यासाठी किमान पात्रता निकष कोणत्याही शाखेत किमान ५० टक्के गुणांसह पदवी घेणे अनिवार्य आहे. किमान ३ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा व्यावसायिक पदवी (CA/CS/ICWA/Institute of Actuaries of India (FIAI)) आवश्यक टक्केवारीसह पूर्ण केलेली असावी.

अभ्यासक्रम

  • व्हर्बल अ‍ॅबिलिटी व रीडिंग कॉम्प्रिहेंशन (VARC)

  • डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग (DILR)

  • क्वांटिट्यूड अ‍ॅप्टीट्यूड (QA)

पेपर पॅटर्न

  • परीक्षेची पद्धत - संगणक आधारित चाचणी

  • परीक्षेचा कालावधी - १२० मिनिटे (प्रति विभाग ४० मिनिटे)

परीक्षा स्लॉट

  • सकाळी - ८:३० ते १०:३०

  • दुपारी - १२:३० ते २:३०

  • सायंकाळी - ४:३० ते ६:३०

  • प्रश्नपत्रिकेची भाषा - इंग्रजी

  • प्रश्न प्रकार - एमसीक्यू आणि नॉन एमसीक्यू

आवश्यक कागदपत्रे

  • दहावी/बारावीची गुणपत्रिका

  • पदवी गुणपत्रिका/प्रमाणपत्र

  • जन्मतारीख प्रमाणपत्र

  • पत्त्याचा पुरावा

  • उमेदवार ओळख प्रमाणपत्र

  • प्राचार्य, विभागप्रमुख किंवा संचालक यांचेकडून अंतिम वर्षाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

  • जात प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

प्रवेश प्रक्रिया

प्रवेश प्रक्रियेतील परीक्षा हा महत्त्वाचा घटक आहे. याबरोबर प्रक्रियेमध्ये लेखी क्षमता चाचणी, गट चर्चा आणि वैयक्तिक मुलाखती यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शैक्षणिक कामगिरी, संबंधित कामाचा अनुभव हे महत्त्वाचे घटक आहेत.

महत्त्वाच्या लिंक

  • https://iimcat.ac.in

  • https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT