Iiser College Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : ‘आयसर’ प्रवेश परीक्षा

भोपाळ, मोहाली, कोलकता, पुणे, बेहरामपूर, तिरुपती, नागालॅन्ड आणि तिरुअनंतपुरम या सातही संस्थामध्ये प्रवेशाकरिता आयसर (IISER) अॅप्टिट्यूड टेस्ट (IAT) राबविली जाते.

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ, मोहाली, कोलकता, पुणे, बेहरामपूर, तिरुपती, नागालॅन्ड आणि तिरुअनंतपुरम या सातही संस्थामध्ये प्रवेशाकरिता आयसर (IISER) अॅप्टिट्यूड टेस्ट (IAT) राबविली जाते.

- के. रवींद्र

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था विज्ञान विषयात पायाभूत व उत्तम शिक्षण आणि संशोधन करणाऱ्या अग्रगण्य राष्ट्रीय संस्थांपैकी एक आहे. भोपाळ, मोहाली, कोलकता, पुणे, बेहरामपूर, तिरुपती, नागालॅन्ड आणि तिरुअनंतपुरम या सातही संस्थामध्ये प्रवेशाकरिता आयसर (IISER) अॅप्टिट्यूड टेस्ट (IAT) राबविली जाते.

अभ्यासक्रम

  • बीएस आणि बीएस-एमएस, ड्युअल डिग्री प्रोग्रॅम-विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पाच वर्षांचा दुहेरी पदवी कोर्स.

  • बायोलॉजिकल, केमिकल, अर्थ व क्लायमेट, इकोनॉमिक सायन्स, इंजिनिअरिंग सायन्स, केमिकल इंजिनिअरिंग, डेटा सायन्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, जिओलॉजिकल सायन्स इ. कोर्सेस उपलब्ध आहे.

पात्रता निकष

  • KVPY किंवा JEE (Advanced) किंवा IAT परीक्षेद्वारे अर्ज करण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक किंवा PIO (भारतीय वंशाची व्यक्ती) किंवा OCI (भारताचे परदेशी नागरिकत्व) असणे आवश्यक आहे. जे उमेदवार भारतीय नागरिक नाहीत किंवा PIO किंवा OCI केवळ JEE (Advanced) परीक्षेद्वारे प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

  • उमेदवारांनी २०२२ किंवा २०२३ मध्ये विज्ञान शाखा बारावी (किंवा समतुल्य) परीक्षेदरम्यान बायॉलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स यापैकी किमान तीन विषयांसह उत्तीर्ण असावेत.

  • सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांनी बारावी (किंवा समतुल्य) परीक्षेत किमान ६० टक्के गुण व SC/ST/PWD मधील उमेदवारांनी किमान ५५ टक्के गुण मिळविलेले असावेत.

प्रवेश प्रक्रिया

JEE चॅनेल

  • जेईई चॅनेल अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार २०२३मध्ये जेईई (अॅडव्हान्स)मध्ये पात्रता यादीमध्ये (GEN-EWS/OBC-NCL/SC/ ST/PWD) १५ हजाराच्या आत रँक असला पाहिजे.

  • केवळ जेईई (अॅडव्हान्स) २०२३ मध्ये उत्तीर्ण उमेदवार पात्र आहेत.

KVPY चॅनेल

  • KVPY-SA-२०२१चे विद्यार्थी ज्यांना तात्पुरता KVPY फेलोशिप पुरस्कार प्राप्त झाला आहे ते प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

  • KVPY एक्सटेडेंड गुणवत्ता यादीतील उमेदवार पात्र नाहीत.

  • टीप - जे उमेदवार या JEE व KVPY चॅनेल प्रवेश घेऊ इच्छित आहे असे उमेदवारांनी IAT-२०२३ साठी परीक्षा देण्याची गरज नाही.

IAT चॅनेल

  • या चॅनेलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संगणक-आधारित ‘आयसर’ अभियोग्यता चाचणी (IAT-२०२३)साठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

  • IAT-२०२३ परीक्षा ता. १७ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित केले जाईल. व ऑनलाइन अर्ज २५ मे २०२३ (गुरुवार) पर्यंत करू शकता.

परीक्षा पॅटर्न

  • आयसर अॅप्टिट्यूड टेस्ट (IAT) संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. यामध्ये ६० प्रश्न असतील, बायॉलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स प्रत्येकी १५ प्रश्न.

  • परीक्षेचा एकूण वेळ १८० मिनिटे. बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असतील.

  • प्रत्येक योग्य उत्तरास ४ गुण दिले जातील.

  • प्रत्येक चुकीच्या उत्तरामुळे १ गुण वजा होईल.

  • अनुत्तरीत प्रश्नांना शून्य गुण दिले जातील.

  • त्यामुळे IAT मध्ये कमाल गुण २४० असतील. रँक लिस्ट तयार करताना २४० पैकी उमेदवाराला मिळालेले एकूण गुण विचारात घेतली जातात.

आवश्यक कागदपत्रे

  • दहावीचे प्रमाणपत्र

  • इयत्ता बारावी (किंवा समतुल्य) गुणपत्रिका आता उपलब्ध नसल्यास, त्याऐवजी स्वाक्षरी केलेले घोषणापत्र अपलोड करू शकता.

  • मूळ गुणपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रती ७ जुलै २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी अपलोड करणे आवश्यक.

  • छायाचित्र

  • स्वाक्षरी

  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)

  • OCI/NRI/PIO दस्तऐवज (आवश्यक असल्यास)

महत्त्वाच्या लिंक - https://iiseradmission.in

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org या वेबसाइटचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT