Pune University Sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : पुणे विद्यापीठ ‘बीबीए’ प्रवेश परीक्षा

‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ (एचएफएम) कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ (एचएफएम) कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.

- के. रवींद्र

व्यवस्थापन आणि प्रशासनशास्त्र अभ्यासाचा पाया हा ‘बीबीए’मध्ये रचला जातो. ‘बीबीए’मध्ये विविध स्पेशलायझेशन अभ्यासक्रम शिकविले जातात, यामध्ये प्रामुख्याने ‘बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन’, ‘बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस’, ‘बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’ व त्याच बरोबर मार्केटिंग, फायनान्स, उद्योजकता, मानव संसाधन, ऑपरेशन्स आणि कॉम्प्युटर सायन्सच्या मूलभूत गोष्टी यासारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ‘बीबीए’पदवी कोर्सनंतर विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत. आपण आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘बीबीए’प्रवेश परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये ‘बीबीए’, ‘एमबीए’, ‘एमबीए’ (फार्मा बायोटेक्नॉलॉजी), ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’ व ‘पीएचडी’ असे विविध व्यवस्थापनाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात.

‘बीबीए’ (एचएफएम) हा ३ वर्ष पदवी अभ्यासक्रम आहे. या कोर्समध्ये किरकोळ, सुविधा, कार्यक्रम आणि आदरातिथ्य आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनाचे वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक घटक समाविष्ट आहे.

‘बीबीए इन हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट’ (एचएफएम) कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.

परीक्षा साधारणत- बारावीचा निकाल लागल्यानंतर होईल व नाव नोंदणी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.

पात्रता

  • आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्होकेशनल असे कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण किंवा परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र आहेत.

  • बारावीत किमान खुला प्रवर्गासाठी ४५ टक्के गुण व इतरसाठी ४० टक्के असणे आवश्यक आहे.

  • इंग्रजी भाषा विषय अनिवार्य आहे.

अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत

  • ऑनलाइन परीक्षा होईल

  • बहुपर्यायी प्रश्न (MCQ) प्रकार

  • एकूण गुण - १००

दोन विभागात परीक्षा होईल.

A विभाग - जनरल ॲप्टिट्यूड २० गुण

  • इंग्रजी व व्हर्बल रिझनिंग

  • लॉजिकल रिझनिंग

  • सामान्य ज्ञान

B विभाग - कोर्स स्पेसिफिक नॉलेज ८० गुण

  • व्हर्बल ॲबिलिटी

  • लॉजिकल रिझनिंग

  • क्वॉन्टिटी ॲबिलिटी

  • सर्व्हिस ॲबिलिटी

आवश्यक कागदपत्रे

  • बारावी किंवा समतुल्य परीक्षेची मार्कशीट

  • दहावी किंवा समतुल्य उत्तीर्ण प्रमाणपत्र

  • आधार कार्ड

लागू पडत असल्यास -

  • जातीचे प्रमाणपत्र

  • जात वैधता प्रमाणपत्र

  • नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र ३१/०३/२०२४ पर्यंत वैध (DT- A NT-B NT-C NT-D आणि SBC सह OBC साठी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा आहे. तसेच काही खासगी महाविद्यालयीन पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी महाविद्यालयस्तरावर प्रवेश परीक्षा आहेत.

महत्त्वाची सूचना - इंजिअरिंग, फार्मसी व अॅग्री कॉमन एंट्रन्स टेस्ट पीसीएम ग्रुपचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी CET CELLच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे व परीक्षेचे वेळापत्रक खालीप्रमाणे राहील.

  • एमएचटी सीईटी २०२३

  • पीसीएम ग्रुप दिनांक - ९/०५/२०२३ ते १३/०५/२०२३

  • पीसीबी ग्रुप दिनांक - १५/०५/२०२३ ते २०/०५/२०२३

महत्त्वाच्या लिंक -

१) https://www.pumba.in/programs/bba-eligibility.htm

२) https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जामडी गावात माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT