Karnataka Education Department esakal
एज्युकेशन जॉब्स

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! PGCET परीक्षा ढकलली पुढं; सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आहे ही Exam

परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूप कमी वेळ मिळत होता.

सकाळ डिजिटल टीम

बीबीए, बीसीए आणि इतर पदवीधर विद्यार्थ्यांच्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परिक्षा होत्या.

बंगळूर : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (केईए) कर्नाटक पदव्युत्तर सामान्य प्रवेश परीक्षा-२०२३ (PGCET) पुढे ढकलली आहे. ही परीक्षा ९ आणि १० सप्टेंबरला होणार होती.

या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सात ऑगस्टला प्रवेश परीक्षा घेण्यात येणार जाहीर केले होते. पण, ही दोन महिने अगोदर घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव आला होता.

मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए), मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (एमसीए), मास्टर ऑफ आर्किटेक्चर (एम.आर्क), मास्टर इन टेक्नॉलॉजी (एमटेक) आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग (एमई) यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (पीजी कोर्सेस) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यातील जागा मिळविण्यासाठी ही परीक्षा आहे.

चार ऑगस्टच्या अधिसूचनेत केईएने जाहीर केले की पीजीसीईटी ९ आणि १० सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. मात्र, ही परीक्षा मागील वर्षाच्या वेळापत्रकापेक्षा दोन महिने आधी घेण्यात येणार होती. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूप कमी वेळ मिळत होता. बीबीए, बीसीए आणि इतर पदवीधर विद्यार्थ्यांच्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परिक्षा होत्या.

तसेच, काही विद्यापीठांनी सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील असे सांगितले होते.. त्यामुळे पीजीसीईटीला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प अहवाल, अंतिम सत्र परीक्षा की, पीजीसीईटीची तयारी करायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. केईएने २३ ऑगस्टला जारी केलेल्या पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन पीजीसीईटी पुढे ढकलण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT