Karnataka Examination Authority CET Exam
Karnataka Examination Authority CET Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Educational News : परीक्षा प्राधिकरणानं बदलली CET परीक्षेची तारीख; आता 'या' दिवशी होणार Exam

सकाळ डिजिटल टीम

नीट निकाल जाहीर झाल्यानंतर केईएमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना नीट स्कोअर आणि रोल नंबर रेकॉर्ड करण्यासाठी मुदत दिला जाईल.

बंगळूर : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (Karnataka Examination Authority KEA) सामायिक प्रवेश परीक्षेची (CET Exam) तारीख बदलली आहे. आता परीक्षा दोन दिवस आधी होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, सीईटी परीक्षा १८ आणि १९ एप्रिलला आहे. यापूर्वी ती २० आणि २१ एप्रिलला होणार होती.

एनडीएची परीक्षा (NDA Exam) २१ एप्रिल रोजी सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कन्नड परीक्षा २० एप्रिलला असल्याचे केईएचे कार्यकारी संचालक एस. राम्या म्हणाले. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील.

वैद्यकीय, दंतवैद्यक, आयुष, बीपीटी, बीपीओ, बीएससी अलाईड हेल्थ सायन्स अभ्यासक्रम प्रवेशासाठी आताच अर्ज करून नोंदणी करावी. नीट निकाल जाहीर झाल्यानंतर केईएमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना नीट स्कोअर आणि रोल नंबर रेकॉर्ड करण्यासाठी मुदत दिला जाईल. सीईटी प्रक्रियेतील सुधारणांचा एक भाग म्हणून, यावेळी अर्ज ‘अ‍ॅप्लिकेशन अँड स्क्रूटिनी’ स्वरूपात आणण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा वेळ वाचेल.

नवीन मॉडेलमध्ये उमेदवारांचे तपशील (शाळेतील उपस्थिती, कन्नड माध्यम, जात, उत्पन्न आणि इतर) एसएटीएस आणि महसूल विभागाच्या वेब सेवेद्वारे ऑनलाइन पडताळले जातील. दस्तऐवज पडताळणीसाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे उपस्थित राहण्याची गरज नाही. दरवर्षी सुमारे दीड महिन्यांसाठी पडताळणीची प्रक्रिया आता अर्जाच्या वेळी केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी सर्व तपशील काळजीपूर्वक भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT