know career opportunities after arts stream and popular courses Marathi article
know career opportunities after arts stream and popular courses Marathi article  
एज्युकेशन जॉब्स

कला शाखेच्या विद्यार्थ्यांना करियरचे असंख्य पर्याय, 'या' क्षेत्रात आहेत दर्जेदार संधी

सकाळ डिजिटल टीम

कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करियर बद्दल लोकांच्या मनात बऱ्याच शंका असतात. तसेच कला शाखेचे विद्यार्थी देखील बऱ्याचदा इतर शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्वतःला मी समजतात. पण कला शाखेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील इतर असंख्य क्षेत्रात करियरच्या शेकडो संधी उपलब्ध आहेत. त्या संधी गाठण्यासाठी योग्य कोर्सची निवड करणे दरजेचे ठरते. चांगली नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील अशा कोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

वकील व्हा

कला शाखेच्या विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने कायद्याचे शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. त्यासाठी एलएलबी अभ्यासक्रम देशातील अनेक नामांकीत विद्यापीठांतर्फे शिकवण्यात येतो आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामध्यो तुम्ही सीएलएटी परीक्षेची तयारी देखील करू शकता, त्यानंतर तुम्हाला देशातील टॉप लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल.

फॅशन आणि टेक्सटाईल डिझाइन 

जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही दोन वर्षांचा पीजी कोर्स देखील करू शकता. तसेच या विषयात 1 वर्षाचा डिप्लोमा आणि 2 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम देखील आहे. मात्र कोर्सबाबत प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो.

शिक्षक

शिक्षक होणे हा पर्याय कला शाखेच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असतो. यासाठी तुम्हाला बीएडला प्रवेश घ्यावा लागेल किंवा एमए केल्यानंतर नेट परीक्षा क्लीअर करावी लागेल. बीएड केल्यावर तुम्ही शाळांमध्ये शिकवू शकता, नेट परीक्षा पास झाल्यावर तुम्ही महाविद्यालयात शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल.

हॉटेल मॅनेजमेंट 

हॉटेल उद्योगात देशातच नव्हे तर परदेशातही स्कोप आहे. हॉटेल उद्योगाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आर्ट्स ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांना करता येतात. या अभ्यासक्रमाचा प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो. या क्षेत्रात तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट, एमबीए टूरिझम इत्यादी करू शकता.

सरकारी नोकरीची तयारी 

आजकाल प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे आणि आपण यूपीएससी किंवा एसएससी नोकरीसाठी अर्ज करू शकता किंवा आपण कोणत्याही इतर सरकारी संस्थेच्या नोकरीसाठी तयारी करू शकता. जर तांत्रिक आणि विशेष क्षेत्रातील नोकऱ्या सोडल्या तर बहुतेक सरकारी नोकरीसाठी कोणत्याही फिल्डमधील पदवी चालते. 

या व्यतिरिक्त, इतर फील्ड्स आणि अभ्यासक्रम 

- पत्रकारिता 
- अ‍ॅनिमेशन 
- विदेशी भाषा तज्ञ 
- एमबीए 
- इव्हेंट मॅनेजमेंट 
- आणि फॅशन उद्योग
- ग्राफिक डिझाइनर 
- शेअर मार्केट
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT