Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : परदेशी भाषा शिकणे करिअरसाठी ठरेल फायदेशीर, वाढतील नोकरीच्या संधी

यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुम्हाला मल्टिटास्किंग असणे आवश्यक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : चांगले करिअर घडवण्यासाठी आपण योग्य शिक्षण, त्याच्याशी संबंधीत विविध कोर्सेसची तयारी करतो. नोकरीसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ही घेतो. मात्र, फक्त नोकरी मिळवली म्हणजे करिअर यशस्वी झाले असे होत नाही.

यशस्वी करिअर घडवण्यासाठी तुम्हाला मल्टिटास्किंग असणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी नव्याने शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वीसारखे आता राहिले नाही. पदवी घेतली आणि नोकरी मिळाली असे आता बिलकुल घडत नाही.

आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला विविध भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याला परदेशी भाषा असे ही म्हणू शकतो. या परदेशी भाषांपैकी कोणत्याही ३ किंवा ४ भाषांचे ज्ञान तुम्हाला अवगत असेल तर तुम्हाला विदेशात ही नोकरीच्या भरपूर संधी निर्माण होतील.

दृष्टिकोनामध्ये बदल होतो

जर तुम्हाला विविध भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुमचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तयार होतो. शिवाय, याचा एक फायदा असा ही आहे की, तुम्ही जगाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅंगलने पाहू शकता, तिथल्या गोष्टी समजून घेऊ शकता.

तसेच, कोणत्याही वातावरणाशी तुम्ही स्वत:ला जुळवून घेऊ शकता. भाषांचे ज्ञान असल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही थेटपणे त्या भाषेत संवाद साधू शकालं.

करिअरमध्ये नोकरीच्या संधी

जर तुम्हाला परदेशी भाषांचे ज्ञान अवगत असेल तर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध भाषा अवगत असणाऱ्या लोकांना प्रामुख्याने संधी दिली जाते. विदेशात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. भाषा अनुवादक म्हणून ही तुमच्यासाठी करिअरची नवी संधी निर्माण होऊ शकते.

परदेशात अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत, अशा स्थितीत तुम्हाला फायदा होईल. याशिवाय तुम्हाला भाषा अनुवादक म्हणूनही नोकरी मिळू शकते.

व्यक्तिमत्वाला पैलू पडतात

बहुभाषिक असणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळाच बदल आणि एक वेगळीच चमक दिसून येते. शिवाय, एकापेक्षा अधिक भाषा अवगत असल्यामुळे, नोकरीच्या क्षेत्रात विविध संधी निर्माण होतात. तुमच्या बोलण्याची शैली सुधारण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT