SSC Result 2025 | Latur Pattern Fails sakal
एज्युकेशन जॉब्स

Latur Schools 0% Result: लातूर पॅटर्नमधल्या १० शाळांमध्ये एकही विद्यार्थी पास नाही! संपूर्ण महाराष्ट्रात 0% वाल्या शाळा किती?

Full List of Maharashtra Schools With 0% SSC Pass Rate: महाराष्ट्रात ४९ शाळांचा दहावी निकाल शून्य टक्के; लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १० शाळा अपयशी.

Anushka Tapshalkar

Latur Pattern Failure 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

दरवर्षी कोकणसह अव्वल स्थानी असणाऱ्या आणि उच्च गुणवत्ता गाठणाऱ्या 'लातूर पॅटर्न'साठी यंदाचा निकाल मात्र निराशाजनक ठरला आहे. कारण संपूर्ण राज्यात ज्या ४९ शाळांचा निकाल ०% लागला आहे, त्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल १० शाळा लातूर जिल्ह्यातील आहेत.

शिक्षणाच्या दृष्टीने मागे असलेल्या भागात दर्जेदार शिक्षणाचा आदर्श म्हणून एके काळी 'लातूर पॅटर्न' ओळखला जात होता. मात्र यंदाच्या निकालाने या पॅटर्नवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याव्यतिरिक्त महाराष्ट्रतील इतर ३९ शाळांचाही निकाल ०% लागला आहे.

महाराष्ट्रातील विभागनीय निकाल

  • पुणे - ७ शाळा

  • नागपूर - ८ शाळा

  • संभाजी नगर - ९ शाळा

  • मुंबई - ५ शाळा

  • कोल्हापूर - १ शाळा

  • अमरावती - ४ शाळा

  • नाशिक - ४ शाळा

  • लातूर - १० शाळा

  • कोकण - १ शाळा

शाळांचा निकाल ०% म्हणजे संबंधित शाळेतील एकाही विद्यार्थ्याला उत्तीर्ण होता आलेले नाही. ही बाब तेथील शिक्षक, शाळा प्रशासन आणि स्थानिक शैक्षणिक यंत्रणांसाठी गंभीर चिंता व्यक्त करणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT