Sarkari Naukri esakal
एज्युकेशन जॉब्स

Layoffs News : नोकरी देणारी 'ही' कंपनी 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार!

आता 'जॉब सर्च प्लॅटफॉर्म' उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचाही टाळेबंदीच्या यादीत समावेश झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वीच Amazon आणि Meta नं आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती.

Layoffs in Job Search Platform : आता 'जॉब सर्च प्लॅटफॉर्म' उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचाही टाळेबंदीच्या यादीत समावेश झाला आहे.

ही कंपनी आपल्या 2,200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीनं सांगितलंय की, ती तिच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के कर्मचारी कमी करणार आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या कंपनीनं कोविड महामारीदरम्यान (Coronavirus) अनेक लोकांना कामावर घेतलं होतं. परंतु, आता ही कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी करत आहे. मोठ्या संख्येनं कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे.

यूएस-आधारित जॉब सर्च प्लॅटफॉर्मनं हा निर्णय घेतलाय. कंपनीचे सीईओ ख्रिस होम्स म्हणाले, 'काही कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 टक्के कपात केली जाऊ शकते. कोविड महामारीच्या काळात नोकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आता कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे.'

कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार

Indeed's blogpost नुसार, प्रभावित कर्मचार्‍यांना जानेवारी ते मार्च बोनस, महिन्याचा नियमित पगार आणि मानसिक आरोग्य सेवांमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना पगार, बोनस आणि इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत.

अमेरिकेत बँकिंग संकट

अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रात आर्थिक मंदी कायम आहे. याठिकाणी चार बँका बुडाल्या असून त्यांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या संख्येनं कर्मचारी कामावरून काढले जात आहेत. मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत.

काही दिवसांपूर्वीच Amazon आणि Meta नं आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. Amazon 9 हजार कर्मचार्‍यांना काढून टाकेल, तर Facebook Meta 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT