Job
Job  Job
एज्युकेशन जॉब्स

भारतीय लष्कर, पोलीस दलासह 'या' विभागात होणार भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

SSC MTS Notification 2022, Latest Government Job 2022 : कर्मचारी निवड आयोगाने ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व पात्र उमेदवार SSC MTS भर्ती 2022 साठी 30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख २ मे आहे.

याव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्रेड B पदांसाठी भरतीसाठी एक शॉर्ट नोटिस जारी केली आहे. या प्रक्रियेद्वारे ग्रेड ब च्या 294 रिक्त जागा भरल्या जातील. सर्व पात्र उमेदवार RBI ग्रेड बी भर्ती 2022 साठी 28 मार्च 2022 पासून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. m

बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने असिस्टेंट टाउन प्लानिंग सुपरवाइजर पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार 6 एप्रिल 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट bpsc.bih.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.\

निमलष्करी दलात (Paramilitary Forces) नोकरी (Job) करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. त्यासाठी (CISF Recruitment 2022) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) स्पोर्ट्स कोट्यांतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (CISF Recruitment 2022) ही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र ज्यांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते सीआयएसएफ https://www.cisf.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (CISF Recruitment 2022) उमेदवार 31 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

MPSC AO Recruitment 2022: राज्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील (General State Services and Public Health Department) रिक्त गट-ब पदांसाठी भरतीसाठी आहेत. सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 मार्च 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना MPSC,च्या अधिकृत वेबसाइटला mpsc.gov.in भेट द्यावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT