LIC Main Exam esakal
एज्युकेशन जॉब्स

LIC च्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर; 'या' दिवशी होणार परीक्षा

सकाळ डिजिटल टीम

LIC AE AAO Mains Exam : भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) सहाय्यक अभियंता (AE) आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) या पदांच्या भरतीसाठी मुख्य परीक्षेच्या तारखेबाबत एक अधिसूचना जारी केलीय. दरम्यान, जे उमेदवार मुख्य परीक्षेला बसणार आहेत, ते LIC च्या अधिकृत वेबसाइटवरून licindia.in परीक्षेचं वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. अधिसूचनेनुसार, मुख्य परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल, असं नमूद केलंय.

दरम्यान, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच या मुख्य परीक्षेला बसू शकतात. मुख्य परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाईल, तर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. या परीक्षेचं प्रवेशपत्र लवकरच जारी करण्यात येणार असून निवडलेल्या उमेदवारांचं किमान वेतन 32795 रुपये प्रति महिना आणि कमाल वेतन 62315 रुपये प्रति महिना असणार आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे 218 रिक्त जागा भरल्या जाणार असून यात सहाय्यक अभियंताची 50 पदं आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांची 168 पदं भरली जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2021 निश्चित करण्यात आली होती. कोरोना लॉकडाउनमुळं 9 उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, 28 ऑगस्ट 2021 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली आणि त्याचा निकाल 29 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT