LinkedIn Job Search  esakal
एज्युकेशन जॉब्स

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

LinkedIn Job Search : लिंक्डइनच्या मदतीने जॉब कसा शोधायचा? चला तर मग जाणून घेऊयात.

Monika Lonkar –Kumbhar

LinkedIn Job Search : आजकाल नोकरी शोधणे हे वाटते तितके सोपे अजिबात नाही. मागील २ वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ले-ऑफ देखील केले जात आहेत. त्यामुळे, सध्या उच्च शिक्षण घेऊन ही नोकरी मिळवणे हे वाटते तितके सोपे राहिले नाही. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांसाठी रिक्त जागा आहेत. परंतु, कधीकधी त्यांना चांगले उमेदवार सापडत नाहीत, तर काही तरूणांना लवकर जॉब मिळत नाही.

जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला लिंक्डइनच्या मदतीने जॉब कसा शोधायचा? त्याबद्दल आज सांगणार आहोत. त्या संदर्भातील काही सोप्या टिप्स आम्ही देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही लिंक्डइनवर सहजपणे जॉब शोधू शकाल. यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्राचे चांगले ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.

लिंक्डइन ॲप डाऊनलोड करा

लिंक्डइन ॲप हे नोकरी मिळवण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. नोकरी मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लिंक्डइन हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात लॉग इन करावे लागेल

लिंक्डइनवर अकाऊंट तयार करा

लिंक्डइन ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. परंतु, ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लिंक्डइनवर तुमचे अकाऊंट तयार करावे लागेल. अनेक तरूण लिंक्डइनवर स्वत:चे अकाऊंट तयार करताना काही चुका करतात. त्यामुळे, तुमचे अकाऊंट तयार करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे त्यात भरा.

जसे की, तुमचे शिक्षण किती, तुम्ही कोणत्या कंपनीत किती वर्षे काम केले? तुमच्याकडे कोणत्या स्किल्स आहेत? तुम्हाला तुमच्या कामासाठी काही पुरस्कार किंवा सर्टिफिकेट्स मिळाले आहेत का? तुमच्या कामाचा अनुभव किती? याबद्दलची संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे द्या. कारण, ही सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळण्याची उत्तम संधी निर्माण होऊ शकते.

अशा पद्धतीने LinkedIn वर शोधा जॉब

लिंक्डइनवर तुमचे प्रोफाईल किंवा अकाऊंट तयार केल्यानंतर, तुम्हाला आता नोकरी शोधण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे? त्याचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर, यासंदर्भातली माहिती तुम्हाला रोज ॲपमध्ये मिळू शकेल.

तुम्ही यासाठी नोटिफिकेशन ऑन ठेवण्याचा पर्याय ही निवडू शकता. जेणेकरून तुम्हाला याबद्दलचे अपडेट्स रोज मिळत राहतील. तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी करायची आहे, त्याबद्दलची संबंधित माहिती तुम्हाला सहज मिळू शकेल.   

मागील काही दिवसांपूर्वीच LinkedIn वर आता हिंदी भाषेत नोकरी शोधण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, ज्यांना इंग्रजी भाषेची अडचण होते, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. पूर्वी हा पर्याय LinkedIn वर उपलब्ध नव्हता. परंतु, आता लिंक्डइनवर हे फिचर आल्यामुळे लोकांना लिंक्डइनच्या माध्यमातून नोकरी शोधणे सोपे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: कुठल्या अधिकाराने तिथे बसला आहात? हायकोर्टाचा मनोज जरांगेंना सवाल, सरकारवरही ताशेरे; वाचा सुनावणीदरम्यान काय घडलं?

Aapli PMPML App: ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला उदंड प्रतिसाद, वर्षभरात ७० कोटीचे ऑनलाइन तिकीट व पास, फक्त या त्रुटी दूर करण्याची गरज

DMart Offers : डीमार्टमधून चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

Latest Marathi News Updates: मराठा समाज आक्रमक; CSMT रोड वर CRP तुकड्या व अश्रूधुराच्या नळकांड्या तैनात

Stock Market Closing: वाढीनंतर, सेन्सेक्स अचानक 207 अंकांनी घसरला; ऑटो आणि फार्मामध्ये विक्री, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT