Livestock Supervisor Vacant posts will be filled by external sources 
एज्युकेशन जॉब्स

पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदभरतीबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे बाह्यस्त्रोतांद्वारे (आउट सोर्सिंग) करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. यासाठी महसूल विभागनिहाय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे. या निर्णयानुसार पशुधन पर्यवेक्षकांची २६२ पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जाणार आहेत.

पुणे विभागातील या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह विभागीय सामाजिक न्याय अधिकारी, आदिवासी खात्याचे विभागीय अधिकारी आदींचा समावेश करण्यात आला आहे.
 

पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त हे या समितीचे सदस्य-सचिव असणार आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षकांची ७७६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या ३७८ पदे रिक्त आहेत. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्या आणि अन्य पक्षांना बर्ड फ्लू या विषाणूची लागण झाली आहे. यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशुस्वास्थविषयक सेवा पुरविण्यासाठी ही रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अव्वर सचिव समीर सावंत यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही रिक्त पदे ११ महिन्यांच्या कालावधीसा कंत्राटी तत्त्वांवर भरण्यात येणार आहेत. यासाठी दरमहा प्रत्येकी १५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. यामानधनाव्यतिरिक्त अन्य कोणतेही भत्ते किंवा सुविधा या कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांना दिल्या जाणार नसल्याचेही सावंत यांनी म्हटले आहे. या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचा आदेशही त्यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिला आहे.


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT