Government Scheme
Government Scheme google
एज्युकेशन जॉब्स

Government Scheme : विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि इंटरनेट

नमिता धुरी

मुंबई : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व इंटरनेट देण्यात येणार आहे. (mahajyoti will give free tab and internet to students )

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गच्या शैक्षणिक, आर्थिक सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना शासन निर्णय ८ ऑगस्ट २०१९ रोजी केली. या अंतर्गत दुर्लक्षित प्रवर्गासाठी उद्देशित कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.  हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास – प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण, युपीएससी, एमपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते.

उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम.फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.

या अंतर्गत मोफत टॅब व इंटरनेट सुविधा देण्यात येत असून यामध्ये लाभार्थी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती भटक्या जमाती किव्हा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा, नॉन क्रिमिलींयर उत्पन्न गटाततील असावा.

जे विद्यार्थी सन २०२३ मध्ये १० वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून, त्यांनी अर्ज करताना दहावीची प्रवेश पत्र व ९ ची गुण पत्रिका जोडावी, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा.

अर्ज करण्यासाठी ९ वी ची गुणपत्रिका, १० वी परीक्षेचे ओळखपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

त्‍यासाठी महाज्योती संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT