Maharashtra State Board HSC Result 2021 
एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2021: बारावीचा निकाल लवकरच होणार जाहीर

दहावीनंतर आता बारावीचा निकालही चांगला लागण्याची अपेक्षा

मिनाक्षी गुरव

पुणे : HSC बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाकडे (HSC Result date 2021) सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 29 ते 31 जुलै या कालावधीत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीनंतर आता बारावीचा निकालही चांगला लागण्याची अपेक्षा केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये होणारी बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावणार असल्याचे जाहीर केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बारावीचा निकाल राज्य सरकारला 31 जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाने बारावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी महाविद्यालयांना शुक्रवारपर्यंतची (ता.२३) मुदत दिली होती, त्यानंतर, एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली होती.

दरम्यान, हे निकाल तयार करण्यासाठी राज्य मंडळाने शिक्षकांना संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीत कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत राज्य मंडळाने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरले जात आहेत. बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती अपलोड करताना सातत्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे बहुतांश ज्युनियर कॉलेजकडून विद्यार्थ्यांचे गुण मंडळाकडे सादर केले आहेत. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांबाबतच्या अडचणी सोडल्यास त्यानुसार बहुतांश नियमित विद्यार्थ्यांचे गुण अपलोड झालेले आहेत. दहावीप्रमाणेच बारावीच्याही निकालाच्या टक्केवारीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

31 जुलै 2026 पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, पंचक आणि आजचे धार्मिक महत्त्व

ढिंग टांग : झुरळांच्या देशा..!

SCROLL FOR NEXT