Online Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

Engineering Admission : अभियांत्रिकीसाठी राज्यात १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. कोरोनापूर्वी काहीसे कमी झालेली प्रवेश संख्या आता वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. कोरोनापूर्वी काहीसे कमी झालेली प्रवेश संख्या आता वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. आता त्यालाच पुष्टी देणारी प्रवेश नोंदणी झाली आहे. अभियांत्रिकीसाठी शुक्रवार पर्यंत (ता. ७) एक लाख ६९ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यातील १ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात अभियांत्रिकी, कृषीसह विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

अभियांत्रिकी पदवीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत संपली असून, कृषी अभ्यासक्रमासाठी रविवार (ता.९) पर्यंतचा कालावधी आहे. सीईटी सेलकडून. विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड व पडताळणी तसेच अर्ज निश्चितीसाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचाच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जातो.

इतर अभ्यासक्रमांची नोंदणी...

कृषी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत रविवार (ता.९) पर्यंत आहे. शुक्रवार (ता.७) जुलैपर्यंत जवळपास २४ हजार ४५८ जणांनी नोंदणी केली असून सुमारे १७ हजार ५०६ जणांनी अर्ज निश्चिती केली आहे. तर एमबीएसाठी ५२ हजार ४२६ जणांनी नोंदणी आणि त्यापैकी ३० हजार ८४० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे.

एमबीएसाठी १४ तारखेपर्यंत अर्ज निश्चिती करता येणार आहे. विधी, एमसीए व बीपीएड अभ्यासक्रमांसाठीही नोंदणी सुरू आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी बुधवार (ता.५) पर्यंत सुमारे ३६ हजार ५०० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार जणांनी अर्ज निश्चित केला. बीपीएडला यंदाही कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाच तारखेपर्यंत केवळ साडे चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अडीच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केली आहे.

अभ्यासक्रमांची नोंदणीची स्थिती( ७ जुलै पर्यंत)

अभ्यासक्रम - नोंदणी - अर्ज निश्चिती

कृषी - २४,४५८ - १७,५०६

अभियांत्रिकी - १,६९,५६४ - - १,४०,२६६

एमसीए - १७,९२८ - १०,७१०

विधी (३वर्षे) - ४६,६२७ - ३६,४१९

विधी (५ वर्षे) - १३,९५४ - १२,७६७

बीएड - ३५,१७२ - २४,८७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT