एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2021 : बारावीचा निकाल आज, कसा अन् कुठे पाहाल?

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra HSC Result 2021: पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी (ता. ३) दुपारी चार वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाने जाहीर केल्याने लाखो विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.

राज्य मंडळाच्या २०२१ मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालात पाहता येणार आहेत. २०२१मध्ये आयोजित केलेली बारावीची परीक्षा राज्य सरकारच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तसेच २०२१मधील बारावीच्या परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध राहील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

दहावीच्या निकालाच्या वेळी एकच संकेतस्थळ उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परिणामी विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी राज्य मंडळामार्फत एकापेक्षा जास्त लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाची सांख्यिकीय माहिती ‘www.mahresult.nic.in’ आणि ‘https://msbshse.co.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

निकाल पाहण्यासाठी लिंक

१) https://hscresult.11thadmission.org.in

२) https://msbshse.co.in

३) hscresult.mkcl.org

४) mahresult.nic.in

आक्षेप, तक्रारी विभागीय मंडळाकडे नोंदवा

सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार जाहीर केलेल्या बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांचे आक्षेप, तक्रारी नोंदविण्यासाठी आणि त्यांचे निराकरणासाठी राज्य मंडळामार्फत संबंधित विभागीय मंडळ स्तरावर तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यासाठी विभागीय मंडळातील विभागीय सहसचिव हे तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम पाहतील. संबंधित विद्यार्थी आपला तक्रार अर्ज टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिशः भेटून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करू शकतात. अर्जाचा नमुना ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामाच्या दहा दिवसांत अर्ज निकाल काढून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करतील. विद्यार्थ्यांना उत्तराबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित विभागीय मंडळातील विभागीय सचिव, विभागीय अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT