ITI Course esakal
एज्युकेशन जॉब्स

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर होणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेत चार प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येतील. यासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित भरण्यासाठी २१ जुलै रोजी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सकाळी दहा ते अकरा या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळ याबाबत काही माहिती किंवा शंका असल्यास जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी केले आहे.

राज्यातील सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खासगी आयटीआय आणि या संस्थांमधील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी ‘https://admission.dvet.gov.in’, ‘www.dvet.gov.in’ तसेच ‘www.ncvtmis.gov.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक -

तपशील : कालावधी

- ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे : ११ जुलैपर्यंत

- प्रवेश अर्ज निश्चित करणे : १९ जून ते ११ जुलै

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आणि अर्ज निश्चिती करणे : १९ जून ते १२ जुलै

- प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १३ जुलै

- गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे : १३ आणि १४ जुलै

- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १६ जुलै

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे : २० जुलै

- पहिल्या यादीत निवड झालेल्या प्रवेशासाठी मुदत आणि मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणी करणे  : २१ ते २५ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT