set exam result sakal
एज्युकेशन जॉब्स

SET Exam : महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर

३७ वी महाराष्ट्र सेट परीक्षा २६ सप्टेंबर रोजी पार पडली होती. परीक्षेत एकूण ७९,७७४उमेदवार उपस्थित होते. यापैकी ५,२९७ उमेदवार सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

सम्राट कदम

३७ वी महाराष्ट्र सेट परीक्षा २६ सप्टेंबर रोजी पार पडली होती. परीक्षेत एकूण ७९,७७४उमेदवार उपस्थित होते. यापैकी ५,२९७ उमेदवार सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

पुणे - प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) (Set Exam) निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी रात्रीपासूनच उमेदवारांना निकाल पाहायला मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र सेट समन्वयक डॉ. बी.पी. कापडणीस यांनी सकाळशी बोलताना दिली.

३७ वी महाराष्ट्र सेट परीक्षा २६ सप्टेंबर रोजी पार पडली होती. परीक्षेत एकूण ७९,७७४उमेदवार उपस्थित होते. यापैकी ५,२९७ उमेदवार सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ६.६४ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व काळजी घेत परीक्षा पार पाडण्यात आली होती. मुंबई आणि पुणे शहरात तुलनेने उमेदवारांची उपस्थिती कमी असल्याचे पाहायला मिळाले. पात्र झाल्याचे ई-प्रमाणपत्र उमेदवारांना ४ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संकेतस्थळावर आपल्या लॉगीनवर जाऊन उमेदवारांना प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती डॉ. कापडणीस यांनी दिली. या निकालाबाबत अधिक माहिती आणि सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

कसा पाहाल निकाल?

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट http://setexam.unipune.ac.in/ वर जा. या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा. यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल. यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा. यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT