maharashtra state board on 11th admission Last chance admission for student sakal
एज्युकेशन जॉब्स

11th admission : अकरावीच्या प्रवेशाची अखेरची संधी

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही काही विद्यार्थी प्रवेशासाठी विनंती करत आहेत

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही काही विद्यार्थी प्रवेशासाठी विनंती करत आहेत. त्याचाच विचार करून राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मंगळवारी (ता.१५) आणि बुधवारी (ता. १६) दरम्यान दैनंदिन गुणवत्ता फेरी म्हणजेच सतत विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या अकरावीचे दुसरे सत्र सुरू आहे. तरीही आणखी काही विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी क्षेत्रीय कार्यालये तसेच संचालनालय येथे येऊन प्रवेशासाठी विनंती करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विलंब होण्याची कारणे तपासली असता त्यामध्ये, अन्य अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी संधी न मिळाल्याने, अन्य ठिकाणी प्रवेश रद्द करणे तसेच स्थलांतर व इतर वैयक्तिक कारणे निदर्शनास आली. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळावी, यासाठी इयत्ता अकरावी राज्यस्तर प्रवेश नियंत्रण समितीसमोर या बाबीवर चर्चा करण्यात आली आणि अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची एक अतिरिक्त संधी देण्याबाबत सदस्यांचे एकमत झाले. त्यानुसार २०२२-२३ मधील अंतिम प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येत आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

असे असतील प्रवेशासाठी कार्यवाहीचे टप्पे

- १५ व १६ नोव्हेंबरला दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात डीएमआर विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल.

- १७ व १८ नोव्हेंबरला शिक्षण उपसंचालक स्तरावरुन महाविद्यालयांचेअलॉटमेंट करण्यात येईल.

- अलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल, १९ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेता येतील.

- प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रवेश रद्द करण्याची सुविधा केवळ १४ ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.

- नवीन विद्यार्थी नोंदणी आणि पडताळणी १२ ते १५ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Pune Petrol Pumps: पुण्यातील पेट्रोल पंप लवकर बंद, काही ठिकाणी रांगा; युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत

Inflation in india : एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत वाढ, आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास पुढील वाटचाल चिंताजनक

RCB vs KKR: दरारा कायम, पण सुधारणाही आवश्यक; कोलकताविरुद्ध बंगळूरच्या फलंदाजांचा कस लागणार? पाहा संभावित Playing XI

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

SCROLL FOR NEXT