maharashtra state borad hsc exam result 2023 date and time announced 25 may 2023 at 2 pm online esakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Result 2023 : बारावीचा निकाल गुरूवारी होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी (ता.१२) दुपारी दोन वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ‘mahresult.nic.in’, ‘https://hsc.mahresults.org.in’, ‘http://hscresult.mkcl.org’ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. ‘www.mahresult.nic.in’ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयांच्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘http://verification.mh-hsc.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी आणि गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे कळविले आहे.

तपशील : कालावधी

  • गुणपडताळणी : २६ मे ते ५ जूनपर्यंत

  • छायाप्रतीसाठी : २६ मे ते १४ जूनपर्यंत

  • गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्र वितरण : ५ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT