Teachers sakal
एज्युकेशन जॉब्स

Teachers Salary : अभियांत्रिकीसह अन्य महाविद्यालयांतील निमंत्रित अध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून येणाऱ्या मान्यवरांच्या मानधनात आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाढ केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून येणाऱ्या मान्यवरांच्या मानधनात आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाढ केली आहे.

पुणे - राज्यातील अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून येणाऱ्या मान्यवरांच्या मानधनात आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने वाढ केली आहे. या महाविद्यालयांमध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून जाणाऱ्या अनुभवी, तज्ज्ञ यांना हे वाढीव मानधन एप्रिलपासून लागू होणार आहे.

तंत्र शिक्षण संचालनालयातंर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन महाविद्यालये, तंत्रनिकेतन या संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींना अध्यापन किंवा मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात येते. परंतु या अनुभवी, तज्ञ मान्यवरांना अल्प मानधनाच्या आधारे बोलाविणे आणि अभ्यासक्रमाचा दर्जा टिकविणे जिकिरीचे होत आहे. त्याअनुषंगाने संबंधित महाविद्यालयांमधील निमंत्रित अध्यापकांच्या मानधनात सुधारणा करण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन होती. त्यानुसार विविध अभ्यासक्रमांसाठी निमंत्रित करणाऱ्या येणाऱ्या अभ्यागत अध्यापकांना सुधारित मानधन एप्रिलपासून लागू करण्यात असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकृष्ण पगारे यांनी अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.

या निर्णयानुसार तंत्र शिक्षण संचालनालयातंर्गत राबविण्यात येणाऱ्या पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका आता विविध अभ्यासक्रमांसाठी उद्योग, व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेल्या तज्ञ, अनुभवी ज्येष्ठ अभियंत्यांना आतापर्यंत एक हजार रुपये प्रति तास देण्यात येत होते. या मानधनात सुधारणा केली असून आता प्रति तास दीड हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

या तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी कमाल नऊ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात असेल. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे त्यांना नियमित सेवेचे कोणतेही हक्क मिळणार नाही. त्यामुळे निमंत्रित अध्यापकांकडून ‘भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी करणार नाही. तसेच, नियमित सेवेच्या कोणत्याही हक्कांची मागणी करणार नाही’ असे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT