बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ  Sakal
एज्युकेशन जॉब्स

बारावीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

राज्य शिक्षण मंडळामार्फत २०२२मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज (आवेदन पत्रे) सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने गुरुवारपर्यंत (ता.२) मुदत होती. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी (एचएससी व्होकेशनल) व सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेतंर्गत विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, तसेच आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ३ ते ११ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.  

परंतु परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनेक तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंडळाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी राज्य मंडळाने २५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT