eleventh admission sakal media
एज्युकेशन जॉब्स

Sakal Impact : महात्मा गांधी जयंती दिनी ठेवलेली प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली

संजीव भागवत

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीचा विसर पडलेले शालेय शिक्षण विभाग 'सकाळ' ने दिलेल्या वृत्तानंतर (sakal news) ताळ्यावर आहे. त्यामुळे जयंतीच्या दिनी ठेवण्यात आलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (eleventh online admission) ही शुक्रवारी, 1 ऑक्टोबर रात्री उशिरा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले. यामुळे आता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया ही आता 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुख्य तीन प्रवेश फेऱ्या आणि त्यानंतर एक विशेष फेरी आयोजित करून शालेय शिक्षण विभागाने एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारासमोर लोटांगण घेत शिक्षण विभागाने प्रथम येणाऱ्यास प्रथम (एफसीएफएस) प्रवेश टप्प्यासाठी तब्बल सात प्रवेश टप्प्याचे आयोजन केले होते. काही मूठभर संस्थांना बेकायदेशीर प्रवेशाचा लाभ व्हावा म्हणून हा सर्व प्रकार करण्यात असल्याचा आरोपही केला जात आहे.

तर यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत. मात्र यात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा शिक्षण विभागाला विसर पडल्याने त्यासाठी, 27 सप्टेंबर रोजी सकाळने 'शिक्षण विभागाचा गलथान कारभार; गांधी जयंतीच्या दिवशीही ठेवली अकरावी प्रवेशासाठीची प्रक्रिया' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जातील, असे आश्वासन शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप दिले होते मात्र त्यासाठी पुन्हा एकदा खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी जाणीवपूर्वक दिरंगाई करत 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी आयोजित केलेली प्रवेश प्रक्रिया ही पुढे ढकलण्याची माहिती विभागाकडे उशिराने सादर केली असल्याचे विभागातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

तर विषयी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी अकरावी प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का करण्यात आली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. तर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी येणारे प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलावे अशी मागणी करणाऱ्या एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख यांनी याविषयी आपण आता काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT