sarathi scholarship sakal
एज्युकेशन जॉब्स

Abroad Education : मराठा विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाला ‘ख्वाडा’; सारथीची शिष्यवृत्ती नाही

परदेशी विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रिया संपून दोन महिने उलटले तरीही मराठा विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीची प्रतिक्षा.

सम्राट कदम

पुणे - परदेशी विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रिया संपून दोन महिने उलटले तरीही मराठा विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्तीची प्रतिक्षा आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने ७५ मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी महाराज सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मात्र, यंदा दिवाळी उजाडली तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाला ‘ख्वाडा’च झाला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी परदेशी शिष्यवृत्तीची प्रक्रिया रखडली असून, परदेशातील प्रवेश प्रक्रिया संपल्या तरीही शिष्यवृत्तीसंदर्भात कोणतीच माहिती नसल्याने उमेदवार आक्रमक झाले आहेत. स्टूडंट हेल्पींग हँडसचे अध्यक्ष ॲड. कुलदीप आंबेकर सांगतात, ‘शासन आणि प्रशासनाच्या प्रचंड दुर्लक्षाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरवर झाला आहे.

एकतर आठ महीने मंत्रालयात धुळखात पडलेल्या या योजनेचे परीपत्रक काढायला उशीर केला गेला. त्यानंतर अर्ज प्रकीयेसाठी सारथीने महिनाभर कालावधी घेतला. आता परदेशातील विद्यापीठे सुरु होउन दोन महिने झालीत. तरीही शिष्यवृत्ती रखडलेलीच आहे.’ शिष्यवृत्ती संबंधीच्या ढिसाळ कारभारामुळे २५ कोटी रूपयांचा निधी अखर्चीत राहण्याची शक्यता असून, अंतिम निवड यादी केंव्हा जाहीर होणार, याची प्रतिक्षा उमेदवार करत आहे.

तर विद्यार्थी अपात्र होतील

विशेष म्हणजे यंदा ७५ जागांसाठी फक्त ८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातही पदवीला ७५ टक्के गुण असावेत, तेथील प्रवेशाची सर्व रक्कम विद्यार्थीनी भरलेली असावी, शैक्षणिक शुल्काला ३० लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे. अशा जाचक अटींमुळे अर्ज भरलेल्यातुनही ५० टक्के विद्यार्थी अपात्र होतील अशी भिती उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

सारथीच्या सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत शिष्यवृत्ती योजनचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अंतिम निवडयादी जाहीर करण्यात येईल.

- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT