digimadhyam 
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टेस्टसिरीज’ आणि ऑनलाइन ‘व्याख्याने’

सकाळ डिजिटल टीम

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी तुम्ही सध्या करत आहात का! याचे उत्तर होय असे असेल, तर मग इकडे लक्ष द्या. कोरोनामुळे या वर्षी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळू शकलेले नाही. ही कसर भरून काढण्यासाठी ‘मराठी डीजी माध्यमा’ने उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी पूर्ण करून घेण्यासाठी ‘टेस्टसिरीज’ आणि ‘ऑनलाइन व्याख्यानमाले’चे आयोजन केले आहे. मुलांना कमीतकमी खर्चात सर्व परीक्षा साहित्य याद्वारे उपलब्ध होणार असून, तज्ज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ च्या मराठी डिजि-माध्यम तर्फे आयोजित आणि टाकळकर क्लासेस प्रस्तुत ही टेस्ट सिरीज आणि ऑनलाइन व्याख्यानमाला असणार आहे. या उपक्रमात दहावीच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई अशा सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांवर आधारित टेस्ट सिरीज दिल्या जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांतील फक्त टेस्ट सिरीज उपलब्ध होतील.

विशेष म्हणजे, या सर्व टेस्ट सिरीज कोरोनानंतर बोर्डाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. कृतिपत्रिका मॉडेल उत्तरांसह विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच ऑनलाइन व्याख्यानमालेत शिक्षणतज्ञ डॉ.अ.ल.देशमुख, डॉ.उमेश प्रधान, प्रा.केदार टाकळकर, डॉ.सुलभा विधाते आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

ऑनलाइन नोंदणीसाठी  www.marathimadhyam.com
नोंदणीसाठी येथे भेट द्या : www.marathimadhyam.com

टेस्टसिरीजची वैशिष्ट्ये :
- एकूण ८ टेस्ट सिरीज
ऑनलाइन व्याख्यानमालेचे वैशिष्ट्ये :
- विषय आकलन व वाचन
- उत्तरपत्रिका लेखन कौशल्ये
- शिकलेले मुद्दे लक्षात ठेवण्याच्या युक्त्या
- उजळणीचे तंत्र
- गुणांवर परिणाम करणारे घटक
- गुण कसे वाढवाल
- उरलेल्या दिवसांत परीक्षेची तयारी करण्याचा गुरूमंत्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT