upsc exam 
एज्युकेशन जॉब्स

आयएएसची तयारी करताय तर या चुका करणे टाळा; अन्यथा मोठे नुकसान

राजेश सोनवणे

जळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी बरीच वर्षांची मेहनत घ्यावी लागते. जे ही परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हे महत्‍त्‍वाचे आहे. यूपीएससी परीक्षेचा पेपर लिहिताना बऱ्याच गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कारण या परीक्षेतील कोणतीही एक चूक आपली वर्षभराची मेहनत वाया घालवू शकते. परीक्षेच्या वेळी काय लक्षात ठेवले पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत; हे महत्‍त्‍वाचे आहे.

‘यूपीएससी’ परीक्षेची तयारी करत असताना नेमके परीक्षेच्या वेळी गोंधळ उडतो. काय लक्षात ठेवावे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. यामध्येच गोंधळ उडतो. परंतु, यूपीएससीची परीक्षेत यश मिळविण्यासाठी या परीक्षेची तयारी करताना कोणत्‍या चुका करू नये; याबद्दल जाणून घ्‍या.


- यूपीएससी परीक्षेची तयारी करताना एक वर्षाचे कोचिंग, स्वत: चा अभ्यास केला तरी देखील परीक्षेच्यावेळी घाम फुटतोच. जेव्हा प्रीमल्स परीक्षा देण्यास जातो; त्‍यावेळी लक्षात येते की चांगली तयारी केली आहे, परंतु परीक्षेच्या पातळीवर कधीही स्वत: ची चाचणी घेतलीच नाही. यामुळे परीक्षेचा दबाव सहन करण्याची क्षमता निर्माण झालेली नसते.

- प्रिलिम्स परीक्षेच्या वेळी किती प्रश्न सोडवायचे आणि किती दिवस किती प्रश्न सोडवू शकतो; याची चाचपणी करून घ्‍यावी. शिवाय किती प्रश्न बरोबर आणि किती चुकीचे येतात हे देखील तपासूण घ्‍यायला हवे.

- बऱ्याचदा पहिल्‍यांदा परीक्षा दिल्‍यानंतर ज्‍या चुका जाणवतात त्‍या दुरूस्‍त करतो. मात्र दुसऱ्यांदा परीक्षा देण्यासाठी गेल्‍यानंतर आपण आत्मविश्वास गमवून बसलेलो असतो. परिणामी परीक्षा देण्याची आपली तयारी नसते. यामुळे परीक्षा देण्यापुर्वी किती चांगले आणि चुकीचे करत आहोत हे आपण पुर्णपणे माहित करून घ्‍यायला हवे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT