marathi school admission 8 thousand students changed medium zilla parishad school ahmednagar esakal
एज्युकेशन जॉब्स

Ahmednagar School News : बदलला कल, मराठी शाळेत चल

पालकांच्या मानसिकतेमुळे माध्यमांतर; ‘झेडपी’कडे ओढा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळांपासून दुरावलेली विद्यार्थ्यांची पावले पुन्हा मागे वळू लागलीत. इंग्रजी शाळांतून मराठी शाळांत येण्याचा कल वाढला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून पालकांची मानसिकता बदललेली दिसते. गेल्या वर्षी सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी माध्यमबदल केला. यंदा जून महिन्यातच सुमारे सातशेच्या घरात प्रवेशबदल झाले.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर पालकांनी विश्वास ठेवल्याचेच हे द्योतक आहे. दर वर्षी प्रवेशसंख्या वाढतच आहे. कोरोना कालावधीनंतर मराठी शाळांकडे ओढा वाढल्याचे दिसते. यापूर्वीही माध्यमांतर होत होते, परंतु तीन वर्षांपासून संख्या वाढते आहे.

पूर्वी पाचवी किंवा आठवीच्या वर्गांत बदल होत. आता सर्वच वर्गांत इंग्रजी शाळांतून मराठी माध्यमांत प्रवेश होत आहेत. त्यातही पालक मुलींच्या तुलनेत मुलांची शाळा बदलत असल्याचे दिसते. सर्वच तालुक्यांत हे बदलाचे वारे आहे.

मराठी माध्यमाच्या शाळांचाही दर्जा सुधारत आहे. नवोदय विद्यालयासाठी जिल्हा परिषदेचेच विद्यार्थी सर्वाधिक निवडले जातात. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा या विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

जिल्हा परिषद, तसेच अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळांत शालेय पोषणआहार, मोफत गणवेश, तसेच इतर सुविधा पुरविल्या जातात.

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात. हेही माध्यमबदलाचे कारण असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.

वर्गनिहाय प्रवेश

वर्ग मुले मुली

  • पहिली -३० -२३

  • दुसरी -८५ -७०

  • तिसरी -९८ -८३

  • चौथी -९४ -५२

  • पाचवी -२५ -१५

  • सहावी -५ -३

  • सातवी -७ -११

  • आठवी -१ -०

दिल्लीच्या धर्तीवर मूल्याधारित पुस्तिका केली आहे. डिजिटल शाळांची संख्या वाढविली जात आहे. अधिकाऱ्यांची मुलेही जिल्हा परिषद शाळेत दाखल होत आहेत. माध्यमांतरामुळे पालकांनी जिल्हा परिषद शाळांवर विश्‍वास दाखवला आहे. शिक्षक हा विश्‍वास सार्थ ठरवतील.

- आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT