MBA Admission  sakal
एज्युकेशन जॉब्स

MBA CET 2023 : MBA च्या प्रवेशाचे गणित बिघडणार ; गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मे अर्ज

राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या ४०८ महाविद्यालयात ५८ हजार ९६० जागा आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने एमबीए प्रवेशात वाढ होणार असल्याची चिन्हे असताना, यंदा सीईटीला मिळालेल्या अल्प प्रतिसादाने ‘एमबीए’च्या प्रवेशाचे गणित बिघडण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या ४०८ महाविद्यालयात ५८ हजार ९६० जागा आहेत. यासाठी १८ आणि १९ मार्चला राज्याच्या सीईटी सेलच्या माध्यमातून प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी झालेल्या नोंदणी प्रक्रियेत यावर्षी ८० हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्यावर्षी त्यासाठी दीड लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत परीक्षा दिली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून एमबीए प्रवेशाच्या सीईटीमध्ये होत असलेला गोंधळ आणि त्यानंतर लांबणारी प्रवेशाची प्रक्रिया यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीही मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या सीईटीमध्ये तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

‘एमबीए’च्या प्रवेशाचे गणित बिघडणार

त्यासाठी सीईटी सेलद्वारे पुन्हा परीक्षेचे आयोजन करीत, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांना परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर प्रवेशाचा मुहूर्त केव्हा निघतो, यावर सर्वकाही अवलंबून आहे. मात्र, जागा आणि प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्यांच्या आकड्यात जास्त तफावत नसल्याने यंदा त्याचा फटका महाविद्यालयांना निश्‍चित बसणार असल्याचे दिसत आहे.

महाविद्यालयांनी वाढविल्या जागा

राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या ५८ हजार ९६० जागा आहेत. गेल्यावर्षी त्या ५६ हजार तर २०१९-२० या सत्रात ५५ हजारावर होत्या. मात्र, एमबीएला चांगले दिवस येत असल्याची चाहुल लागताच, बऱ्याच महाविद्यालयांनी एमबीएच्या जागांमध्ये दुपटीने वाढ करून घेतली. त्यामुळे आता त्या जागा ५८ हजारावर गेलेल्या आहेत. तेव्हा याचाही फटका निश्‍चित महाविद्यालयांना बसणार आहे.

प्लेसमेंट वाढले

एमबीए अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ झाली. त्यानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. २०२०-२१ या वर्षात एकूण प्रवेशातील २० हजार ५१० विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले होते. २०२१-२२ या वर्षांत यावर्षी त्यामध्ये साडेतीन हजाराची वाढ होत, २३ हजार ६५६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले.

राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत एमबीएसाठी नोंदणी कमी झाल्याने निश्‍चितच प्रवेशावर परिणाम होणार आहे. वाढलेल्या जागामुळे तो आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. वेळेतच यावर उपाय शोधण्याची गरज आहे.

डॉ. सुजित म्हैत्रे, प्राचार्य, श्री बिंझाणी सिटी महाविद्यालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटच्या क्षणापर्यंत गुप्तता; ऑपरेशन सिंदूरचा आदेश चिठ्ठीतून पोहोचला, नेमकं काय घडलं होतं? धक्कादायक खुलासा

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Police Honour: उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : हायकोर्टाच्या परीक्षेत गडबड, कल्याणमध्ये विद्यार्थ्यांनी अडवली न्यायाधीशांची गाडी

SCROLL FOR NEXT