mba.jpg sakal
एज्युकेशन जॉब्स

एमबीए, एमसीए प्रवेशाच्‍या नोंदणीची २० पर्यंत मुदत

सीईटी सेलतर्फे वेळापत्रक जाहीर; महिनाअखेरीस कॅप राउंड

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सीईटी सेलने पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एमबीए आणि एमसीए यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार सीईटी दिलेल्‍या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २० नोव्‍हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करायची आहे. महिन्‍याअखेरपासून कॅप राउंडची प्रत्‍यक्ष प्रक्रिया पार पडेल.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा होती. वेळापत्रक जाहीर झाल्‍याने अखेर ही प्रतीक्षा संपली असून, प्रवेशप्रक्रियेला गती मिळाली आहे. या वेळापत्रकानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना २० नोव्‍हेंबरच्‍या सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. स्क्रुटिनी पद्धतीद्वारे कागदपत्रे पडताळणी व प्रवेश अर्ज भरण्यासाठी २१ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. प्रवेशप्रक्रियेच्‍या अधिकृत वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सीईटी सेलच्‍या संकेतस्‍थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, एमबीए व एमसीए यांच्‍या ऑनलाइन अर्जाची मुदत सारखी असली, तरी वेळपत्रकात किरकोळ बदल आहेत.

असे आहे एमबीए प्रवेशाचे वेळापत्रक...

  • ऑनलाइन नोंदणीची मुदत २० नोव्‍हेंबरपर्यंत

  • कागदपत्र पडताळणी, प्रवेश अर्ज भरणे २१ नोव्‍हेंबरपर्यंत

  • प्रारूप गुणवत्तायादीची प्रसिद्धी २२ नोव्‍हेंबर

  • यादीसंदर्भात तक्रार, हरकतीची मुदत २३ ते २५ नोव्‍हेंबर

  • अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्धी २६ नोव्‍हेंबर

  • पहिल्‍या कॅप राउंडची नोंदणी मुदत २७ ते २९ नोव्‍हेंबर

  • पहिल्‍या कॅप राउंडची निवड यादी २ डिसेंबर

  • प्रवेशनिश्‍चिती प्रक्रियेची मुदत ३ ते ५ डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT