वाटा करिअरच्या... : मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि सखोल संशोधनाच्या संधी sakal media
एज्युकेशन जॉब्स

वाटा करिअरच्या... : मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि सखोल संशोधनाच्या संधी

सध्याच्या स्थितीत एफईएमधील संशोधनात परिणामकारक पद्धती व भरवशाचा अल्गॉरिदमचा आराखडा विकसित करण्यावर भर दिला जातो आहे

राजीव बोस

मॅकेनिकल इंजिनिअरिंग ही सर्वांत महत्त्वाची शाखा म्हणून गणली जाते. त्यातील फायनाइट एलिमेंट ॲनॅलिसिस अर्थात एफईएकडे आता अनेक विद्यार्थी आकर्षित होताना दिसत आहेत. ही मागणी विशेषतः या क्षेत्रात असलेल्या संशोधनाच्या विपुल संधींमुळे आहे. या संशोधनातून स्ट्रक्लचरल, थर्मल व फ्लुइड मॅकेनिक्समधील कोणत्याही समस्यांचे विश्‍लेषण करता येते व हवे असलेले उत्तर शोधणे शक्य होते. एफईएमुळे गुंतागुंतीचा प्रश्‍न वेगळा करून त्याचे तुकड्या तुकड्यांत विश्‍लेषण करीत उत्तर शोधणे शक्य होते व हेच या तंत्राचे बलस्थान आहे. प्रश्‍नाची भौमितिक रचना कशीही असो, त्याला योग्य प्रकारच्या चाळण्या लावून एफईएम तुम्हाला हवे असलेले अचूक उत्तर शोधून देण्यात यशस्वी ठरते.

सध्याच्या स्थितीत एफईएमधील संशोधनात परिणामकारक पद्धती व भरवशाचा अल्गॉरिदमचा आराखडा विकसित करण्यावर भर दिला जातो आहे. यामध्ये शक्तीशाली संगणकांचा उपयोग केला जातो. त्यातून सायन्स आणि इंजिनिअरिंगबद्दलचा नवा दृष्टिकोन यशस्वी ठरत असून, त्यामध्ये कॉम्प्युटिशनल मॉडेलिंग व सिम्युलेशनचा महत्त्वाचा वाटा आहे. एफईएमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या पदवीधारक व मास्टर्स प्रोग्रॅम पूर्ण केलेल्यांना व मेकॅनिकल इंजिनिअरिंग व मटेरिअल सायन्समधील मूलभूत ज्ञान असलेल्यांना या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. यासाठी हायपर वर्क्स, एबीएक्यूयूएस, फी-सेफ, टोस्का आणि आयसाइटसारखे सॉफ्टवेअर्स उपयोगात आणली जातात. गेल्या ५० वर्षांत एफइएने एरोस्पेस ॲनॅलिसिस, डिफेन्स ॲनॅलिसिस व कार ॲनॅलिसिसमध्ये व त्याच्या उपयोगांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संबंधीचे सर्व अभ्यासक्रम सखोल संशोधनाची इच्छा असणाऱ्यांसाठी, अत्यंत चांगली शैक्षणिक पार्श्‍वभूमी असणाऱ्यांसाठी व उद्योगांतील कामाच्या अनुभव असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात.

या क्षेत्रात उत्कृष्ट आणि आव्हानात्मक करिअर संधी व त्याचबरोबर जगातील मान्यताप्राप्त संस्थांमध्ये सखोल संशोधनाची संधी असल्याने हा अभ्यासक्रम मॅकेनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्वांना हवाहवासा अभ्यासक्रम ठरला आहे. तुम्हीही या क्षेत्रात करिअर करून जगातील महत्त्वाच्या शहरांत बड्या पगाराची नोकरी मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT