admission sakal media
एज्युकेशन जॉब्स

‘अभियांत्रिकी’साठी करा १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज

अंतिम गुणवत्ता यादी २७ ला, पहिली फेरी २८ पासून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न संस्था आणि विभाग, तसेच विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या (बी.ई आणि बी.टेक) प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील सर्वसाधारण गुणवत्ता यादी २२ नोव्हेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी २७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत दोन प्रवेश फेऱ्या होतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी, ऑनलाइन अर्ज सबमिट करणे, आवश्यक कागदपत्रे संबंधित संकेतस्थळावर अपलोड करणे, ही कागदपत्रे आणि अर्ज प्रमाणित (व्हेरिफाय) करणे, अर्ज निश्चिती करणे ही सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे. या प्रक्रियेतंर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या साहाय्याने ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष जवळच्या सुविधा केंद्रांवर जाऊन स्क्रुटिनीचा पर्याय निवडता येईल. प्रवेशाची पहिली फेरी २८ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया...

  • ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रे अपलोड करणे : १८ नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

  • कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती, ई-स्क्रुटनी किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन स्क्रुटनी करणे : २० नोव्हेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

  • तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे : २२ नोव्हेंबर

  • सर्वसाधारण तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर हरकती, आक्षेप नोंदविणे : २३ ते २५ नोव्हेंबर

  • अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणे : २७ नोव्हेंबर

  • प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २७ नोव्हेंबर

प्रवेश फेऱ्यानिहाय प्रक्रिया


पहिली फेरी :

  • पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि पर्याय निवडून अर्ज निश्चित करणे : २८ ते ३० नोव्हेंबर

  • तात्पुरती ॲलॉटमेंट यादी जाहीर करणे : २ डिसेंबर

  • विद्यार्थ्यांना महाविद्यालय ॲलॉट होणे, ॲलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश स्वीकारणे : ३ ते ५ डिसेंबर

  • ॲलॉट झालेल्या महाविद्यालयाला रिपोर्ट करणे, प्रवेश निश्चिती, कागदपत्रे सबमिट करणे, प्रवेश शुल्क भरून प्रवेश घेणे : ३ ते ६ डिसेंबर (सायं. पाच वाजेपर्यंत)

दुसरी फेरी :

  • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : ७ डिसेंबर ऑनलाइन सबमिशन, अर्ज निश्चिती, दुसऱ्या फेरीसाठी पर्याय निवडणे : ८ ते १० डिसेंबर तात्पुरती ॲलॉटमेंट जाहीर करणे : ११ डिसेंबर

  • महाविद्यालय ॲलॉट होणे, ॲलॉट झालेल्या महाविद्यालयातील प्रवेश स्वीकारणे : १२ ते १४ डिसेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • ॲलॉट झालेल्या महाविद्यालयाला रिपोर्ट करणे, प्रवेश निश्चिती, कागदपत्रे सबमिट करणे, प्रवेश शुल्क भरून प्रवेश घेणे : १२ ते १४ डिसेंबर (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

  • रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे, प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे : १५ ते २२ डिसेंबर

  • अभ्यासक्रमाला सुरवात करणे : ६ डिसेंबर

  • प्रवेशाचा डेटा अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत : २४ डिसेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT