MHT CET 2025 Result LIVE 

Sakal

एज्युकेशन जॉब्स

MHT CET Result 2025 Declared : 'एमएचटी सीईटी' परिक्षेच्या 'पीसीएम' ग्रुपचा निकाल जाहीर; इथे पाहू शकता रिझल्ट

How to check MHT CET 2025 PCM result online: एमएचटी सीईटी 2025 चा पीसीएम ग्रुपचा निकाल जाहीर झाला असून उमेदवारांना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

Anushka Tapshalkar

MHT- CET Result 2025: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज (ता. 16) रोजी जाहीर झाला आहे.

पीसीएम फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स (PCM) ग्रुपचा निकाल आज झाला असून, पीसीबी- फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी (PCB) ग्रुपचा निकाल उद्या लागणार आहे. याआधी परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या संभाव्य तारखेनुसार निकाल 19 जून रोजी लागण्याची शक्यता होती. मात्र आता विभागाने अधिकृतरीत्या निकालाची तारीख स्पष्ट केली आहे.

या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. ही परीक्षा दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी देत असून, यंदाही दोन्ही ग्रुपसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परीक्षेसाठी एकूण 7 लाख 25 हजार 640 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर त्यांच्या उत्तरपत्रिकांबाबत आक्षेप नोंदवण्याची संधी मिळाली होती. पीसीबी ग्रुपसाठी 18 मे आणि पीसीएम ग्रुपसाठी 21 मे ही अंतिम मुदत होती. या प्रक्रियेनंतर आता अंतिम निकाल जाहीर होत आहेत.

निकाल ऑनलाइन कसा पाहाल?

एमएचटी-सीईटीचा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • अधिकृत वेबसाइट https://cetcell.mahacet.org/ वर लॉग इन करा.

  • मुख्य पेजवर “MHT-CET 2025 Results” लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • ‘PCM Group’ किंवा ‘PCB Group’ पैकी संबंधित ग्रुप निवडा.

  • तुमचा ईमेल आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

  • निकाल स्क्रीनवर दिसेल. त्याची प्रिंट घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT