MHT-CET sakal
एज्युकेशन जॉब्स

MHT-CET : ‘एमएचटी सीईटी’साठी केलेल्या अर्जात सुधारणा करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा यापूर्वीच ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. २२) अर्जात दुरुस्ती, सुधारणा करण्याची संधी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - तुम्ही एमएचटी-सीईटी परीक्षेचा अर्ज भरला आहे आणि तुमच्या अर्ज भरताना नाव लिहिताना चुक झाली असेल किंवा चुकीची जन्म तारीख नोंदविली गेली असेल तर, तुम्हाला पुन्हा ऑनलाइन अर्ज ओपन करून त्यात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.

होय, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा यापूर्वीच ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (ता. २२) अर्जात दुरुस्ती, सुधारणा करण्याची संधी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तंत्रशिक्षण आणि कृषीशिक्षण विभागांतर्गत असलेल्या ‘एमएचटी सीईटी २०२४’ या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता परीक्षा शुल्क देऊन विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

दरम्यान, त्यापैकी काही विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून ई-मेल, दूरध्वनी अशा विविध मार्गाने सीईटी सेलकडे करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात बदल, दुरुस्ती करण्याची संधी सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, ग्रुप बदल करणे, ग्रुप समावेश करणे, असे बदल करता येणार आहेत, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT